फलटण (प्रतिनिधी):- सोमवार पेठ,फलटण येथे दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी यामध्ये परस्परविरोधी तक्रारी फलटण शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आल्या आहेत.
याबाबत फलटण शहर पोलिस ठाण्यातुन दिलेल्या माहितीनुसार ,उमेश पवार याने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की,लॉकडाऊन काळात खासदार यांच्या कडुन आलेले धान्य वाटप का केले याचा राग मनात धरुन सोमाशेठ जाधव याच्या लोकांकडुन माझ्या घरात जबरदस्ती घुसुन विक्रम सोमाशेठ जाधव,राहुल रमेश पवा, विलास पवार,दिलीप पवार,दिपाली पवार,सुवर्णा जाधव,दीपाली पवार ची मावशी भोसले ,साहिल पवार,रुपेश पवार यांनी दगडविटा लोखंडी पाईप दांडके कोयता बेसबॉल याने मारहाण करुन कुटुंबियांनाही जीवे मारण्याचा प्रयत्न करुन गंभीर जखमी केले असुन उमेश पवार याच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.याचा अधिक तपास पो.नि.पोमण हे करीत आहेत.
तर दुसऱ्या फिर्यादीमध्ये दिपाली पवार यांनी म्हटले आहे की,मी घरात असताना शिवीगाळ करण्याचा आवाज आला हे पाहण्यासाठी मी घराबाहेर आले असता उमेश पवार याची भावजय सुवर्णा रणजित जाधव तिच्या भावजया सुमन रमेश पवार आशा दिलीप पवार छाया अरुण भोसले यांना उमेश नरसिंग पवार व इतर आरोपी हे हॉकी स्टिक ने लाकडी दांडक्याने दगडाने मारहाण मला मारहाण करुन करून मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले व माझी मावशी छाया भोसले हिला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून उमेश पवार अरुण पवार यांनी तू मध्ये पडायचे नाही म्हणून त्यांनी स्वतःलाच लाकडी दांडक्याने व तलवारीने मारून घेतले आहे आम्ही कोणीही त्यांना मारहाण केली नाही आसे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे.याबाबतचा अधिक तपास स.पो.नि.राऊळ हे करीत आहेत.