बारामती: बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरातून जाणाऱ्या महापारेषण कंपनीच्या 220 केव्ही भूमिगत वीजवाहिनीच्या पूर्वनियोजित कामासाठी आज गुरुवारी (ता. 7) सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत बारामती शहर, एमआयडीसी व तालुक्याच्या परिसरात वीज पुरवठा बंद राहणार आहे. या भूमिगत वीजवाहिनीचे काम गुरुवारी पूर्ण होणार आहे. महापारेषण कंपनीची जेजुरी ते बारामती ही 220 केव्ही अतिउच्चदाब टॉवरलाईन बारामती “एमआयडीसी’मधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रांगणातून जात आहे. त्यामुळे ती भूमिगत करण्याचे काम सुरू आहे. हे काम गुरुवारी पूर्ण होणार आहे.
या कामासाठी “महापारेषण’कडून सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत बारामती 220 केव्ही उपकेंद्राचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येईल. पर्यायाने या उपकेंद्रातून महावितरणच्या विविध उपकेंद्रांना होणारा वीजपुरवठा देखील बंद राहणार आहे. त्यामुळे बारामती शहर, बारामती तालुक्याचा ग्रामीण, एमआयडीसी परिसरातील वीजपुरवठा बंद राहणार आहे.
या कालावधीत नागरिकांनी सहकार्य करावे, अशी विनंती महापारेषण व महावितरणकडून करण्यात आली आहे.