बारामती: कोरोनामुक्त बारामतीत कटफळ या ठिकाणी कोरोनाचा रुग्ण आढळून आलेला आहे, त्याला उपचारासाठी मुंबई येथे पाठविण्यात आले आहे अशी माहिती मिळाली आहे,त्यामुळे ऑरेंज झोनमध्ये जाण्याचे बारामतीकरांचे स्वप्न भंगले आहे.12 मे पर्यंत बारामती मध्ये कोरोना आढळला नाही तर बारामतीतील दुकाने सुरू होणार असे जाहीर केले होते,परंतु आता बारामती मध्ये कोरोना रुग्ण आढळून आल्यामुळे बारामतीकरांची चिंता वाढली आहे.
बारामती एमआयडीसी मध्ये सोमवारपासून तीस टक्के कामगारांसह उद्योग व व्यापार सुरू केले होते,परंतु बारामती एमआयडीसी लगत असणाऱ्या कटफळ या गावात कोरोना रुग्ण आढळून आल्यामुळे आता बारामती मध्ये सुरु असलेले उद्योगधंदे बंद होतात की काय अशी शंका वाटू लागली आहे.
बारामती कटफळ येथे मिळून आलेला रुग्ण हा बारामतीतील 9वा रुग्ण आहे,यापूर्वी बारामतीमध्ये आठ रुग्ण मिळून आले होते, त्यापैकी दोन रुग्णांचा मृत्यू झालेला आहे व सहा रुग्ण उपचाराअंती बरे झालेले आहेत.
रुग्ण मिळून आलेला भाग प्रशासनाकडून सील करण्यात आलेला आहे,तसेच रुग्णाच्या जवळच्या संपर्कातील लोकांना क़्वारंटाईन करण्यात आले आहे,व त्यांच्या कोरोना तपासण्या लवकरच केल्या जाणार आहेत.