नांदगिरी -: सातारा जिल्ह्यात पुणे-बंगलोर महामार्ग वर वसलेला कल्याणगड म्हणजेच नांदगिरी

सह्याद्रीच्या रांगेत सह्याद्रीच्या कुशीत नांदगिरी ऊर्फ कल्याणगड उभारलेला आहे पुणे ते सातारा या महामार्गावर पूर्वेला कल्याणगड हा किल्ला आहे सपाट माथा असलेल्या या किल्ल्याच्या माथ्यावर असलेला एकमेव वटवृक्ष मुळ्या हा किल्ला दुरूनच ओळखू येतो
हा किल्ला सातारा जवळ असल्याने आपण या किल्ल्यावर जाऊ शकतो तसेच या किल्ल्यावर जाण्यासाठी अनेक वाटा आहेत या किल्ल्यावर पाहण्यासारखी अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात कल्याण गडाच्या पूर्वेकडून गडावर जाणारी पायवाट आहे त्याला धुमाळ वाडी हे गाव आहे सध्या गावास नांदगिरी असे म्हणतात नांदगिरी मधून गडावर जाणाऱ्या पायवाटेच्या काही नव्याने बांधलेल्या पायऱ्या आहेत
सुरवातीच्या पायर्‍या संपल्यानंतर मुरमाड वाट आहे. या वाटेने आपण चढून उजवीकडील डोंगरदांडावर येतो. या मार्गावर दिशा दाखवण्यासाठी पिवळ्या रंगाचे बाण जागोजाग रंगवलेले असल्यामुळे रस्त्यात भरकटण्याची शक्यता नाही. या दांडावर आल्यानंतर अर्ध्या डोंगरात एक कोरलेली गुहा आहे. आत पाच सहा दगडी खांब आहेत. यात सध्या पाणी भरलेले आहे. येथून पुढे गडावर जाणारे विजेचे खांब लागतात. या खांबांना धरुनच वाट गडावर पोहोचते. पूर्व बाजूला असला तरी उत्तराभिमुख असा कल्याणगडाचा पहिला दरवाजा आहे. या दरवाजाच्या खालच्या पायर्‍यांच्या दुरुस्तीचे काम सध्या चालू आहे. या दरवाजामध्ये गावकर्‍यांनी लोखंडी जाळी बसवलेली आहे. या किल्ल्याला भेट देणार्‍या किल्ले प्रेमी मंडळीपेक्षा भक्त मंडळीच मोठ्या संख्येने असतात.
कल्याणगडाचा माथा दक्षिणोत्तर पसरलेला असून आटोपशीर आहे. माथ्यावरील एका वास्तूचे नूतनीकरण करून भक्त मंडळीसाठी निवासस्थान उभारलेले आहे. या वास्तूसमोरच एक समाधी असून बाजूला पाण्याचे मोठे तळे आहे. पाण्याचा उपसा नसल्यामुळे पाणी शेवाळलेले आहे. माथ्यावर वाड्याची व शिबंदीच्या घरट्यांची जोती आहेत. मध्यभागी वडाचे मोठे झाड आहे. झाडाखाली कबर आहे. दक्षिण टोकावर कोरडे पडलेले पाण्याचे टाके आहे. या टोकावरून समोरच जरंडेश्वराचा डोंगर दिसतो. सातारा शहर आणि अजिंक्यतारा किल्ला तसेच यवतेश्वराही दृष्टिपथात येतात. पूर्वेकडे किन्हईमधील यमाई देवीच्या डोंगर, तसेच एकांबेचा डोंगर दिसतो. त्यामागे भाडळीकुंडल रांगेतील वर्धनगडही दृष्टीत पडतो. संपूर्ण गड पाहण्यात तासभर पुरतो. गड पाहून, पुन्हा आल्यामार्गानेच गड उतरायला लागतो. कल्याणगडावरील वैशिष्ट्यपूर्ण असे जलमंदिर मात्र स्मृतिपटलावर कायमचे कोरले जाण्यासारखे आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!