फलटण टुडे (बारामती वृत्तसेवा ) : –
४3 दिवसाच्या प्रदिर्घ कालावधीनंतर बारामती एमआयडीसी मधील काही कंपन्या सुरु झाल्या आहेत . केंद्र व राज्य शासनाच्या नियमाचे पालन करून सदर कंपन्या सुरू करण्यासाठी परवानग्या घेण्यात आल्या आहेत.
या मध्ये अति रक्त दाब,दमा, मधुमेह हृदय रोग इत्यादि व 45 वर्षा वरील कामगारांना कामावर घेऊ नये, कामगारांची रोजचे रोज कारखान्यात प्रवेश करताना न चुकता प्राथमिक आरोग्य तपासणी करावी. थंडी ताप ,सर्दी खोकला अशी लक्षणे असणारे कामगारांना कामावर न घेता वैद्यकीय तपासणीसाठी ताबडतोब पाठविणेत यावे.
कॉन्टेमेंट झोन मधील कोणत्याही व्यक्तींना कामावर बोलावू ही नये व घेऊ ही नये, दिलेल्या वाहन पासेस चा वापर फक्त कारखान्यात कामावर जाण्या येण्या साठीच करावा अशा स्पष्ट सुचना सर्व कामगारांना द्याव्यात .
आपला कारखाना चालु आहे याबद्दलचा अहवाल मागितलेल्या माहिती नुसार रोजचे रोज एमआयडीसी पोर्टल वर न चुकता द्यावा
व महसूल विभाग ,पोलीस विभाग,एमआयडीसी अधिकारी,बारामती चेंबर चे पदाधिकारी आपल्या कारखान्याला कधीही भेट देऊन अटीनुसार कारखाना चालु आहे का याची पाहणी करणार आहेत तेव्हा त्यांना सर्व माहिती द्यावी
जर एमआयडीसी मध्ये एक जरी करोना लागण केस मिळाली तरी संपुर्ण एमआयडीसी तील सर्व कारखाने ताबडतोब 24 दिवसा साठी बंद होतील याची कृपया सर्वांनी नोंद घेऊन योग्य ती खबरदारी घेऊन कारखाने चालवावेत हा इशारा सुद्धा शासनाच्या वतीने देण्यात आला आहे.
बारामती एमआयडीसी मधील कंपन्या सुरू करण्यासाठी प्रांताधिकरी दादासाहेब कांबळे,उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर,एमआयडीसी बारामती व प्रादेशिक कार्यालय,मुख्य कार्यालय मधील अधिकारी,बारामती चेंबर्स चे
अध्यक्ष प्रमोद काकडे कार्याध्यक्ष दत्ता कुंभार,पंढरीनाथ कांबळे सचिन माने , विजय कासार, नरेश तुपे,शंकर कचरे,भानुदास सालगुडे,शहाजी रणनवरे प्रफुल्ल मुथा व बारामती मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार व इतर सहकारी यांनी विशेष प्रत्यन केल्याने सर्व कंपन्यांचे प्रमुख,अधिकारी व उद्योजक यांनी आभार व्यक्त केले.