अजित दादा युथ फाऊंडेशन च्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न

बारामती वार्ताहर :
महाराष्ट्रातील  व बारामती  तालुक्यातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेता अजित दादा युथ फाऊंडेशन, बारामती यांनी  रविवार दिनांक 3/5/2020 रोजी कांचन नगर युनिक रेसिडेन्सी बारामती बजाज शोरूम च्या समोर रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम भारत सरकार व महाराष्ट्र सरकार यांच्या सोशल डिस्टनसिंग चे पालन करून, सकाळी ९.००० ते दुपारी ३.०० या वेळेत कांचन नगर येथे संपन्न झाला. या कार्यक्रमात कांचन नगर मधील महिला, पुरुष व तरुण, तरुणींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सदर कार्यक्रमास सचिन सातव, दीपक मलगुंडे, अभिजित जाधव, सोमनाथ ( आप्पा ) गायकवाड, विलास परकाळे, संजुभाऊ गवळी, दत्तात्रय कोडलकर, बंडू जगताप, वाघमोडे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
 अजित दादा फाउंडेशन, बारामती शहर व ग्रामीण बारामती या विविध भागात पुढील काही दिवसांमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करणार असल्याचे अजितदादा युथ फौंडेशन चे अध्यक्ष सोमनाथ गायकवाड यांनी सांगितले.
फोटो :रक्तदान करताना अजितदादा युथ फौंडेशन चे सदस्य (छाया दत्ता माने)
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!