फलाटण (मितेश उर्फ काका खराडे):फलटण येथे जनधन योजनेचे पैसे पोस्ट खात्यात जमा होणार म्हणून शंकर मार्केट फलटण येथील पोस्टाच्या मुख्य कार्यालयात पहाटे चार वाजल्यापासून तब्बल चार ते पाच तास रांगेमधय नवीन खाते काढण्यासाठी महिला व वृद्धांनी गर्दी केली लॉक डाउन असल्याने लोकांच्या हाताला काम नसल्याने व पोटा पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे ही गर्दी झाली होती. यामध्ये कुठलेही सामाजिक अंतर ठेवण्याचा उपयोग केला दिसत नव्हता किंवा तशी खबरदारी पोस्ट ऑफिसने येथे घेतलेली दिसत नव्हती आज पहाटे तर परिसरातील नागरिकांनी फोन करून सांगितले की जागेवरून महिलांन मध्ये भांडणे झाल्याचे सांगण्यात आले असून पोस्ट अधिकारी कुठलीही जबाबदारी घेताना दिसत नाहीत. तेव्हा पोस्ट अधिकाऱ्यांना फोन केला असता त्याच्या म्हणण्यात असे कुठलेही पैसे खात्यात जमा होणार नाहीत असे सांगण्यात आले . त्यानंतर फलटण शहर पोलीस स्टेशनचे मा.पोमण साहेबांना सामाजीक कार्यकर्ते मितेश खराडे यांनी फोन करून सगळी कल्पना दिली असता त्यांनी तात्काळ यत लक्ष घालून त्याचे लोक पाठवून तिथला प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले.व लोकाना समजाउन सांगून द्यरी पाठवले.व पोस्टखात्याला तसा बोर्ड टाकन्यास सांगितला. तरी सर्व लोकांना एकच विनंती आहे की असे कुठलेच पैसे जमा झाले नसून कुठल्याही अफवांना बळी न पडता सुरक्षित घरी राहावे असे सांगण्यात आले.