फलटण: फलटण तालुक्यातील विडणी गावचे तरूण शेतकरी श्री सुरज दत्तात्रय नाळे या शेतकाऱ्याने आपल्या शेतात निसर्गाच्या संकटावर मात करत कोबी आणि टोमॅटोचे अत्येंत चांगल्या प्रतीचे उत्पादन घेतले. पिक तोडणीला आल्यानंतर कोरोना कोव्हिड19या रोगाच्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्रासह देशभर लॉकडाऊन चालू झाले. आत्यअवश्यक सेवेत भाजीपाला असल्याने त्याची विक्रीला परवानगी असताना सुध्दा या शेतकऱ्याने शेतमालाची विक्री न करता मोफत वाटण्याचा निर्णय घेतला.
लॉकडॉऊनमुळे हातावर पोट असणाऱ्या गोरगरीब नागरीकांचे उत्पन्नाचे मार्ग बंद झाले अशा गोरगरीब नागरीकांनवर उपासमारीची वेळ आली.हि सर्व परस्थिती सुरज दत्तात्रय नाळे या तरूण शेतकऱ्याला बघवली नाही. भाजीपाला मार्केट चालू असताना सुध्दा आपण समाजाचे अन्नदाता आहोत या भावणेने या तरूण शेतकऱ्याने आपल्या शेतातील कोबी आणि टोमॅटो हे फलटण शहरातील गोरगरीब जणतेला मोफत घरोघरी जाऊन स्वत्ताच्या हताने वाटप चालू केले आत्तापर्यंत जवळपास 8000 किलो कोबी आणि 18000 किलो टोमॅटो मोफत वाटप केले असल्याचे मि विचारल्यावर या शेतकऱ्याने सांगीतले. आजुन गरज पडल्यास पुन्हा मोफत वाटप करणार आहे असे सुद्धा या अन्नदाताने सांगीतले. ️