फलटण तालुक्यातील काशीद वाडी काशीद वाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये अवैध वाळू उपसा जोरात विचारणा केल्यास पत्रकारास जिवे मारण्याची धमकी…

साखरवाडी प्रतिनिधी:
सध्या देशामध्ये कोरोना चे भयानक संकट ओढवले असताना  सध्या सर्वत्र लाॅकडाऊन  केले आहे परंतु फलटण तालुक्यामध्ये या लाॅकडाऊन चा गैरफायदा घेत वाळूमाफियांनी हैदोस घातलेला आहे.
अधिक माहितीनुसार मौजे काशीद वाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये ओढ्याच्या पात्रात खूप मोठा वाळूचा साठा उपलब्ध आहे. या वाळू साठ्यावर काही वाळूमाफिया दहशतीच्या जोरावर अंधाराचा फायदा घेत राजरोसपणे वाळू उपसा करत आहेत. कोणालाही न जुमानता येथील वाळू सर्व लोकांच्या नजरेसमोरून रोज बेकायदेशीर वाहतूक होत आहे  याप्रकरणी दै. महाराष्ट्र न्यूज पत्रकार  यांच्याकडे लोकांच्या अनेक तक्रारी आल्या होत्या सदर गोष्टीची  शहानिशा करण्यासाठी पत्रकार व त्यांचे सहकारी संबंधित ठिकाणी गेल्या असता त्याठिकाणी एम एच ११. यू ८२७७ या ट्रॅक्टर मध्ये बेकायदेशीर वाळू काही लोक भरत असल्याचे आढळून आले या लोकांना विचारले असता त्यांच्याजवळ कोणताही परवाना नसल्याचे त्यांनी सांगितले. त्याच वेळी दोन इसम धीरज रणवरे रा.काशिदवाडी , गोरख पिसाळ रा.वडजल  हे त्या ठिकाणी त्यांच्या गाडीवरून आले त्यांनी  पत्रकार व त्यांच्या सहकाऱ्यांना अरेरावीची भाषा करत आमची गाडी कोणी अडवू नये, आमचे कोणीच काही करू शकत नाही, इथून निघून जावा नाहीतर तुम्हाला जीवे मारू अशी धमकी दिली 
. याबाबतचे अधिक माहिती घेतली असता वरील दोघांनी लाखो रुपयांची बेकायदेशीर वाळू विकली असल्याचे समजले.
सदर गोष्टीची तक्रार पत्रकार व त्यांच्या सहकाऱ्यांनी मा. प्रांताधिकारी सो यांच्या निदर्शनास आणली व त्या   ठिकाणचे फोटो ,व्हिडिओ त्यांना दाखवण्यात आले प्रांताधिकाऱ्यांनी तात्काळ  तलाठी व सर्कल यांना आदेश देऊन त्या ठिकाणचा पंचनामा करून संबंधित दोघांवर व ट्रॅक्टर मालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
सदर दोन व्यक्तींच्या विरोधात  फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे…
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!