बारामती वार्ताहर :
सर्व जगात कोरोना 19 विषाणू मुळे बिकट परिस्थीती निर्माण झालेली आहे, आणि यातून हाथावर पोट असलेल्या अत्यंत गरजू परिवाराला जी झळ बसत आहे ती खुप बिकट आहे. अशा या बिकट परिस्थितीत आजी माजी सैनिक संघटना बारामती मुख्य शाखा करंजेपुल यांनी स्वइच्छेने वर्गणी करून आणि धान्य जमा करून दिनांक 19 एप्रिल 2020 रोजी गरजू आणि हाथावर पोट असलेल्या 125 परिवारांना आवश्यक असलेले किराणा आणि धान्य वाटप मा. श्री. प्रमोद काका काकडे सभापती बांधकाम आरोग्य जिल्हा परिषद पुणे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. तसेच याप्रसंगी वडगाव पोलिस स्टेशन चे सहायक पोलिस निरीक्षक मा. सोमनाथ लांडे साहेब हे ही उपस्थित होते.
तसेच 01 मे 2020 रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. अजित दादासो पवार यांच्या कार्याच्या प्रेरेणेतुन आणि मा. श्री. हनुमंत पाटील साहेब ( विशेष कार्यकारी अधिकारी, उपमुख्यमंत्री कार्यालय मुंबई) व तहसिलदार बारामती यांच्या मार्गदर्शन नुसार जी रक्कम चेक द्वारे देण्याची ठरले होती त्या रकमेचे किराणा किट घेऊन ते गरजूपर्यंत पोहचवले तर ठीक राहील असा सल्ला मिळाला.
तरी नंतरच्या टप्प्यात रुपये 42000/-चा किराणा (113 किट) खरेदी करण्यात आले व ते सर्व किट बारामती येथे मा.दादासाहेब कांबळे साहेब(प्रांताधिकारी बारामती),मा. तहसिलदार श्री.विजय पाटील साहेब यांच्या हस्ते सैनिक शाहिद झालेल्याच्या पत्नी वीरनारी यांना वाटप करण्यात आले व निवडक गरीब गरजू ना देण्यात आले. व बाकीचे किट गरजू पर्यंत पोहच करण्यासाठी तहसिलदार बारामती व प्रांतसाहेब यांच्याकडे देण्यात आले. तसेच तहसिलदार व प्रांतसाहेब बारामती कार्यालयात ही सॅनिटायझर चे वाटप करण्यात आले. तसेच DYSP मा. श्री. नारायण शिरगावकर (बारामती ) , मा. श्री. अण्णासाहेब घोलप (ग्रामीण बारामती तालुका इनिस्पेक्टर) यांना सॅनिटायझर चे वाटप करण्यात आले. तसेच बारामती शहर आणि ग्रामीण पत्रकार बांधव यांना ही सॅनिटायझर चे वाटप करण्यात आले. संघटनेचे आतापर्यंत चे काम पाहता संघटना नेहमीच सामजिक बांधिलकी या भावनेतून सतत समाजासाठी काम करत असते.
याही वेळी संघटना अशा बिकट परिस्थीतीत मदतीचा हाथ पुढे करण्यासाठी पुढे आली आणि 88 हजार रूपए एकत्रित करून त्याचे किराणा वाटप केले. आणि 870 किलो धान्य वाटप 400 गरजू परिवारापर्यंत पोहचवन्याचे काम संघटनेच्या आणि सोमेश्वर स्पोर्ट्स अकॅडमी च्या माध्यमातून करण्यात आले.
तसेच माजी सैनिक स्वतः स्वेच्छेने पोलीस प्रशासनास मदत करण्यास या परिस्थितीत तयार आहेत.त्याबाबत पोलीस प्रशासनास इच्छुकांची यादी देण्यात आली आहे. तसेच काही माजी सैनिक रक्तदान करण्यास तयार आहेत.त्यांची यादी मा. तहसिलदार बारामती यांना देण्यात आली आहे.
ही आजी माजी सैनिक संघटना आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनास ज्या ज्या वेळी मदत लागेल त्या वेळेस मदत करण्यास पुढील काळात सुद्धा तयार असेल. ही बाब सैनिक संघटनेच्या अध्यक्ष व कार्याध्यक्ष यांनी प्रांत साहेबांच्या निदर्शनात आणून दिली.
आजी माजी सैनिक संघटना करत असलेले काम देश सेवा करून आल्यानंतर सुद्धा आपण गोरगरीब गरजूंना मदत करत आहात ही समाजातील तरुणांना प्रेरणा देणारी बाब आहे व आपण खरंच खूप छान काम करत आहात. आपल्या पुढील कामास शुभेच्छा मा.प्रांत साहेबानी किराणा किट वाटप झाल्यानंतर व्यक्त केल्या.