फलटण :- महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे यांचे मार्गदर्शनाखाली फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप पोमण व फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितिन सावंत तसेच दोन्ही पोलिस स्टेशनचे आधिकारी व कर्मचारी यांचे संयुक्तरीत्या वर्गणीतून फलटण शहर व तालुक्यातील आशा कर्मचारी यांना मदत करण्यात आली.
शासनाचे मानधन हे अतिशय कमी असते व सध्याचे परास्तिथीमध्ये त्यांचे कामाचे योगदान हे मोठे व सन्मान करण्यासारखे असल्याने कोरणा विषाणू संसर्ग पार्श्वभूमीवर असले संचारबंदी अनुषंगाने पंधरा दिवस पुरेल असे गहु, तांदूळ,साखर,डाळ,तेल, व इतर असे मिळून 1000 रुपये किमतीचे किराणा मालाचे साहित्य वाटप केलेले आहे. फलटण तालुक्यामध्ये एकुण २७० आशा स्वंयसेवीका आहेत. पोलिसांनी आशा भगिनींच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये त्यांच्या कामाचा सन्मान व्हावा म्हणून हातभार लावलेला आहे.
सदर कार्यक्रम उपविभागीय पोलीस आधिकारी यांचे कार्यालयात प्रातनिधीक स्वरुपात घेण्यात आला. सदर कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप, गटविकास आधिकारी अस्मिता गावडे व पोलीस आधिकारी व कर्मचारी हजर होते.