फलटण : फलटण तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह संख्या ४ वर पोहचली असून काल सकाळी तरडगाव येथिल कोरोना बाधीत निकट सहवासीत माहिलेला कोराना झाल्याचा रिपोर्ट आला होता. दि 2 रोजी सदर पहिली कोरोना पॉझिटिव्ह मुलीचा ही अहवाल प्राप्त झाला त्यात ही कोरोना निगेटिव्ह आढळून आल्याने फलटण तालुक्यात एक प्लस तर एक मायनस अशी परिस्थिती झाली होती. सदरची कोरोना पॉझिटिव्ह मुलगी ही कोरोना मुक्त झाल्याची माहिती डॉ. गाडीकर यांनी दिली आहे.
सदर महिलेच्या संपर्कात आलेल्या लोकांना होम क्वारंटाइन करण्यात आले होते.त्यांचे स्वॅब तपासणी साठी पाठवण्यात आले होते.बुधवार दिनांक २९ एप्रिल रोजी सदर रग्णाचे घेतलेल्या नमुन्यांपैकी पहिल्या पाॅझिटिव्ह रुग्णाच्या कुटुंबातील ६ वर्षीय मुलाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. अजुनही त्या कुटुंबातील ३ व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहेत. अशी माहिती उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली आहे. फलटण एकूण कोरोना बाधित संख्या ४ वर जाऊन पोहचली आहे.