फलटण :- श्री. बिरदेव देवस्थान ट्रस्ट जाधववाडी ता.फलटण तर्फे 200 गरजू कुटूंबाना अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले. त्यामुळे गरजूंनी समाधान व्यक्त केले. जास्तीत नागरिकांनी आपल्या आसपासच्या गरजूंना अन्नधान्य वाटप करावे असे आवाहन ट्रस्ट च्या वतीने करण्यात आले आहे.
सध्या देशावरती कोरोना विषाणुच्या भयंकर संकटामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामूळे बहुसंख्य लोकांना आपला रोजगार सोडून घरी बसावे लागले आहे. त्यामुळे लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या परिस्थितीमध्ये श्री. बिरदेव देवस्थान ट्रस्ट जाधववाडी ता.फलटण तर्फे गरजूंना गव्हू, तांदूळ, डाळ, साखर, तेल, साबण असे अन्नधान्याचे 200 किट देण्यात आले. याप्रसंगी
श्री. बिरदेव देवस्थान ट्रस्ट जाधववाडी ता.फलटण चे सर्व विश्वस्त व श्री. बिरदेव मंदिराचे पुजारी यांच्या हस्ते गरजू व्यक्तीना धान्य किट देण्यात आले.
आजअखेर विविध समाजिक कामात नेहमीच अग्रेसर असलेल्या श्री. बिरदेव देवस्थान ट्रस्ट जाधववाडी ता.फलटण यांनी नेहमीच सामाजिक कामात मदत करण्याचा प्रयत्न केला आहे. विविध कार्यक्रमांचे आयोजन करून गरजूंना मदत करण्यात हि ट्रस्ट अग्रेसर राहिली असून यावेळी हि अत्यंत कठीण परिस्थितीत लॉकडाउनच्या काळात गरजू कुटूंबाना हलाखीच्या परिस्थितीला तोंड द्यावे लागू नये; म्हणून अन्नधान्य किटचे वापर करण्याचा निर्णय घेत 200 कुटूंबाना किटचे वाटप केले.