सातारा दि. 1 : वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे बाळंतपणासाठी आलेल्या कोविड बाधित गरोदर मातेच्या संपर्कात आलेले 6 आरोग्य कर्मचारी, 1 गरोदर माता व 1 निकट सहवासित असे एकूण 8 नागरिकांचा अहवाल कोविड-19 बाधित असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, प्राथमिक तपासण्यानंतर या सर्वांची प्रकृती स्थिर असून, विलगीकरण कक्षात लागू असलेल्या सर्व नियमानुसार काटेकोरपणे निगराणीखाली उपचार चालू आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
आता सातारा जिल्ह्यात 42 रुग्ण कोविड बाधित असून आता पर्यंत 8 (कोविड 19) मुक्त होऊन रुग्णालयातून सोडले आहेत तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात एकूण 52 कोविड-19 बाधित रुग्णआढळले आहेत.