आसू ( राहूल पवार) २९ :- आसू येथील पांडव कालीन मंदिरातील आसू गावचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ यात्रा उत्सवास काल पासून सुरुवात झाली असून प्रशासनाच्या आदेशाचे पालन करत यावर्षी होणारा यात्रा उत्सव रद्द करून श्री काळभैरवनाथ यात्रा उत्सव कमिटीने व आसू ग्रामपंचायतीने हा यात्रेचा होणारा कार्यक्रम साध्या पद्धतीने देवाला नैवेद्य दाखवून पार पाडण्याचे ठरवले होते.
आसू येथील श्री काळभैरवनाथ यात्रा तीन दिवस चालते त्यामध्ये पहिल्या दिवशी देवाच्या हळदी तर दुसऱ्या दिवशी देवाचे लग्न देवाची पालखी पूर्ण गावात फिरून छबिना काढला जातो या पद्धतीने यात पालखी व देवाची काठी व त्या बोरबर मानकरी व ग्रामस्थ सर्व वाजता गाजत ग्रामप्रदक्षीना घालतात.अशा पद्धतीने आसू येथील यात्रा उत्सव पार पडत असतो. या यात्रेची अनेक वर्षांची परंपरा असून यावर्षी या परंपरेला खंड न पडून देता प्रशासनाच्या आदेशाचे पालन करत देवाचे धार्मिक विधीचा कार्यक्रम पार पाडण्याचे नियोजन यात्रा कमिटीने केले असून या नियोजनाला आसू ग्रामस्थांनी पूर्ण सहकार्य करण्याचे ठरवले होते.
आसू यात्रोत्सवास 27 एप्रिल पासून सुरुवात झाली असून यात्रेच्या पहिल्या दिवशी देवाच्या हळदीचा कार्यक्रम पार पाडण्यात आला या कार्यक्रमाला सोशल डिस्टन्स ठेवत नियमाचे पालन करत गावातील चार महिलांनी मंदिरात जाऊन देवाला हळद लावण्याचा कार्यक्रम पूर्ण केला. त्याचबरोबर दुसरा दिवस म्हणजेच देवाच्या लग्नाचा दिवस या दिवशीही गावातील यात्रा कमिटीचे सदस्य तसेच पुजाऱ्यांच्या उपस्थित सोशल डिस्टन्स ठेवून नियमाचे पालन करत देवाच्या लग्नाचा कार्यक्रम पार पाडला.यावेळी स्पिकरवरून मंगलाष्टका म्हणून लग्न लावन्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी आपल्या घरातूनच अक्षदा वाहिल्या व पोलिस प्रशासनाला सहकार्य करत यात्रा उत्सव कमिटीने तसेच गावातील ग्रामस्थांनी प्रशासनाच्या आदेशाचे पालन करत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला सहकार्य केले.