बारामती:वार्ताहर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन मुळे वाढदिवस साजरा करण्यासाठी सर्व नातेवाईक,मित्र परिवार याना एकत्र येता येत नसल्याने मोबाईल च्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने एकत्र येऊन बांधकाम व्यवसाईक हर्षवर्धन शिंदे यांची कन्या राजनंदिनी हिचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
या प्रसंगी लॉकडाऊन मुळे बांधकाम क्षेत्रातील मजूर,गवंडी,बिगारी आदी ची उपासमार होऊ नये म्हणून ‘जीवनावश्यक’ वस्तू चे वाटप करण्यात आले या प्रसंगी 100 मजुरांना शंभर जीवनावश्यक किट देण्यात आले. सोशल डिस्टन पाळून सदर वितरण कार्यक्रम संपन्न करण्यात आला व मुख्यमंत्री सहायता निधीस मदत देण्यात आली “सामाजिक भान व जाणं जपत कोल्हापूर सांगली येथील पूरग्रस्तांना मदत केली होती आज लॉकडाऊन मधील बांधकाम मजुरांना सहकार्य करणे माणुसकीचे लक्षण आहे त्यामुळे वाढदिवस अगदी साधेपणाने साजरा करीत मदत करीत असल्याचे हर्षवर्धन शिंदे यांनी सांगितले”
ऑनलाइन पद्धतीने दिलेल्या शुभेच्छा साजरी केलेल्या कविता,शेरो शायरी ऐकून ज्येष्ठ नातेवाईकांनी समाधान व आनंद व्यक्त केला. स्वागत व आभार हर्षवर्धन शिंदे यांनी मनले.