फलटण तालुक्यातील कारखान्यांनी शेतक-यांचे पैसे तात्काळ द्यावेत : प्रदिप झणझणे

फलटण: कधी कोरडा दुष्काळ, कधी ओला दुष्काळ, कधी अतिवृष्टी, कधी ट्रान्सफाॅर्मरअभावी पिके जळाली, तर कधी शेतमालाचे दर कोलमडले. अशा सर्व अडचणींचा सामना करत शेतकरी पीक घेत असतो. ऊसाला हमीभाव मिळतो, म्हणून शेतकरी ऊसाचे पीक घेतो. दीड वर्ष ऊसाला पोरासारखा सांभाळतो आणि मेहनत- काबाडकष्ट करुन फलटण तालुक्यातील कारखान्यांना ऊस घालतो. कायद्यानुसार ऊस गाळप झाल्यानंतर 14 दिवसाच्या आत शेतक-यांचे पैसे देणे संबंधित कारखान्यांना बंधनकारक आहे. परंतु अशी एकंदरीत परिस्थिती असतानाही फलटण तालुक्यातील कोणताच कारखाना शेतक-यांना वेळेवर पैसे देत नाहीत. 
कोरोना महामारी लाॅकडाऊनमुळे शेतकरी पुरता मेटाकुटीस आलेला असताना त्यांना आणखी मोठ्या अडचणींच्या दरीत लोटण्याचा प्रकार सर्वच कारखाना प्रशासन करत आहेत. शेतक-यांच्या घामावर व जीवावर चाललेले फलटण तालुक्यातील हे कारखाने, त्या शेतक-यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची सोडुन, अशाप्रकारे कृतघ्नपणा दाखवत आहेत.
फलटण तालुक्यातील ऊस उत्पादक शेतक-यांना न्याय मिळवून देण्यासाठी फलटण प्रांताधिकारी यांना फलटण तालुका शिवसेनेच्यावतीने निवेदन देत आहे की प्रांताधिकारी यांनी योग्य दखल घ्यावी व फलटण तालुक्यातील शेतक-यांना न्याय मिळवून द्यावा. ही नम्र विनंती.
कायद्यानुसार ऊस गाळप झाल्यानंतर फलटण तालुक्यातील कोणताच कारखाना 14 दिवसांच्या आत शेतक-यांना वेळेवर पैसे देत नाही व आर्थिक पिळवणूक- फसवणूक करत असल्याबद्दल शेतक-यांच्या आलेल्या तक्रारींबाबत शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांचेकडेही पत्रव्यवहार करणार आहे. फलटण तालुक्यातील शेतक-यांना न्याय मिळवून देण्यासाठी फलटण तालुका शिवसेना कटीबद्ध आहे. 
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!