बारामती: कोरोना च्या पार्श्वभूमिवर लॉकडाऊन मुळे बांधकाम क्षेत्रातील मजूर,गवंडी,बिगारी आदी ची उपासमार होऊ नये म्हणून ‘जीवनावश्यक’ वस्तू चे वाटप करून बांधकाम व्यवसाईक हर्षवर्धन शिंदे यांनी त्यांची कन्या राजनंदिनी हिचा वाढदिवस साजरा केला या प्रसंगी 100 मजुरांना शंभर जीवनावश्यक किट देण्यात आले. कोणतेही फोटो व व्हिडिओ शूटिंग न काढता सोशल डिस्टन पाळून सदर वितरण कार्यक्रम संपन्न करण्यात आला व मुख्यमंत्री सहायता निधीस मदत देण्यात आली “सामाजिक भान व जाणं जपत कोल्हापूर सांगली येथील पूरग्रस्तांना मदत केली होती आज लॉकडाऊन मधील बांधकाम मजुरांना सहकार्य करणे माणुसकीचे लक्षण आहे त्यामुळे वाढदिवस अगदी साधेपणाने साजरा करीत मदत करीत असल्याचे हर्षवर्धन शिंदे यांनी सांगितले”