फलटण :- येथील सोमवार पेठ येथे एका व्यक्तीच्या घरामध्ये मुंबईवरुन एक कोरोनाग्रस्त मुलगी आली आहे अशी अफवा पसरवल्या प्रकरणी महिलेवर फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण शहर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, माधुरी मछिंद्र जाधव वय -22 रा.सोमवार पेठ हिने सोमवार पेठ मध्ये अफवा पसरवली की, ऋतीक सोमा पवार याच्या घरामध्ये मुंबईवरुन एक कोरोनाग्रस्त मुलगी आली आहे. अशी अफवा पसरविल्यामुळे सोमवार पेठेमध्ये गोंधळ निर्माण झाला. ऋतीक सोमा पवार यांच्या घराचा दरवाजा उघडून पहिला असता घरात कोणीच आढळून आले नाही यानंतर ऋतीक सोमा पवार यांच्याकडे चौकशी केली असता मुबंईहुन कोणीही राहण्यासाठी आले नाही असे समजल्यानंतर सदर महिलेवर शेजारी राहणारे बाबु शंकर पवार रा.सोमवार पेठ यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन माधुरी मछिंद्र जाधव हिच्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक फौजदार भोईटे हे करीत आहेत.