फलटण : दि.26एप्रिल रोजी पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन व नगरपालिका यांची संयुक्तरित्या फलटण शहरात कोरोना विषाणू संसर्ग अनुषंगाने बंदोबस्त/ पेट्रोलिंग करीत असताना मा. जिल्हा दंडाधिकारी सो सातारा यांनी मटण विक्री व मत्स्य विक्री ही दुकानात न करता ऑर्डर घेऊन घरपोच करण्याचे आदेश दिले असताना सदर आदेशाचे उल्लंघन करून मेटकरी गल्ली फलटण येथील जय भवानी मटन शॉपचे मालक बबलू मारुती इंगवले राहणार खटीक गल्ली फलटण व रविवार पेठ येथील रोहन मटन शॉपचे मालक प्रसाद जनार्दन सरगर राहणार रविवार पेठ फलटण हे स्वतःचे फायदे करता लोकांची गर्दी जमून मटण विक्री करीत असताना मिळून आल्याने त्यांच्यावर फलटण शहर पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तरी फलटण शहरातील मटण व मत्स्य विक्री करणाऱ्या लोकांना कळविण्यात येते की आपण सदरची विक्री ही ऑर्डर घेऊन करावी जर कोणी मा. जिल्हा दंडाधिकारी सो सातारा यांनी दिले आदेशाचे उल्लंघन करून कोणत्याही प्रकारे मटणाचे दुकानावर लोकांची गर्दी जमुन मटन विक्री करीत असताना मिळून आल्यास त्यांचेवर भादविस कलम 188 तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51, महाराष्ट्र covid-19 चे कलम 11 प्रमाणे गुन्हा दाखल करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.असे आवाहन फलटण शहर पोलिसांनकडून करण्यात आले आहे.