कोरोना व्हायरस मूळे जनजीवन ठप्प असताना सरकारी कर्मचारी मात्र स्वतःच्या जीवावर उदार होऊन कर्तव्य बजावत आहेत.
आता एप्रिल च्या ऐन उन्हाळ्यात देखील पोलीस कर्मचारी लोकांनी संचारबंदी चा भंग करू नये म्हणून उन्हात उभे राहून आणि रात्र रात्र जागुन गस्त करीत आहेत, फलटण तालुक्यतील खुंटे गावा मध्ये देखील वेगळी अवस्था न्हवती,
हीच गोष्ट खुंटे गाव चे युवा तंटामुक्ती अध्यक्ष श्री हेमंत बाळासाहेब खलाटे यांच्या निर्देशनास आली.
त्यांनी या बाबत विचारपूस केली व तत्परतेने त्यावर कार्यवाही करून ग्रामीण पोलीस स्टेशन च्या पोलिसांना गस्त चालू असताना बसण्यासाठी मंडप व खुर्ची ची व्यवस्था करून दिली,
त्यावेळी पोलीस कर्मचारी यांच्या चेहऱ्यावरील समाधान च सर्व काहि सांगून जात होते।
कोणतीही मदत होत असताना ती किती तत्पर व परिणामकारक आहे हे पाहिले जाते, त्यावेळी श्री हेमंत खलाटे यांनी तत्परता दाखवून पोलिसना सावली करून दिली त्याचे पंचक्रोशी मध्ये कौतुक होत आहे.
ह्या सावली ची व्यवस्था करून तंटा मुक्ती अध्यक्ष श्री हेमंत खलाटे यांनी खुंटे गाव व पोलीस स्टेशन मधील नात्याला प्रेमाची सावली दिली असलेचे चित्र आहे.