फलटण प्रतिनिधी- फलटण तालुक्यातील गिरवी येथे रविवार दि. १९ एप्रिल रोजी सकाळी यात्रेचे आणि त्यानंतर पालखी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.जिल्हाधिकारी सातारा यांच्या आदेशाचे पालन न केल्याप्रकरणी गिरवी गावच्या अध्यक्ष, सचिव व ग्रामसभेमधील सर्व सदस्य यांना २१ एप्रिल रोजी फलटणचे उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप यांनी कारणे दाखवा नोटीसा दिल्या होत्या. गिरवी हे गाव कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहे तरीसुद्धा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला न जुमानता येथील यात्रा समितीने यात्रेचे आयोजन केले होते. त्यानंतर स्थानिक प्रशासनाने याची दखल घेत दोषींना नोटिसा बजावल्या होत्या,याच अनुषंगाने आज दिनांक २५ एप्रिल रोजी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, रविवार १९ एप्रिल रोजी गिरवीचे ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथाची यात्रा भरवण्यात आलेली होती. जिल्हाधिकारी सातारा यांनी सार्वजनिक सण,उत्सव,यात्रा असे कोणतेही सण साजरे करु नयेत असा आदेश देण्यात आला होता मात्र आदेशाला केराची टोपली दाखवत यात्रा समितीने यात्रा भरवली होती.याच अनुषंगाने गिरवी गावातील ग्रामस्थ १)सरपंच शरद मेघा मदने,२)जगदीश शिवाजीराव कदम,३)अशोक श्रीरंग कदम४),हणमंत काशिनाथ कवितके,५)राजेंद्र विलास खांडे,सर्व रा गिरवी तालुका फलटण यांनी शासनाची कोणतीही परवानगी न घेता मनाई आदेश असताना बेकायदेशीरपणे जमाव जमवुन गावातून भैरवनाथ देवाची पालकीची मिरवणुक काढली अशी तक्रार मंडलाधिकारी कैलास विठ्ठलराव जाधव यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.