आसू {राहुल पवार}- आसु गावचे ग्रामदैवत भैरवनाथ यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे. आसू गावचे ग्रामदैवत काळभैरवनाथ यात्रेला दि.२८ एप्रिल रोजी प्रारंभ होत आहे. आसू ग्रामपंचायत व यात्रा कमिटीने मीटिंग घेऊन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व प्रशासनाच्या आदेशाचे पालन करत ग्रामदैवत काळभैरवनाथाची यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
अखंड चालणारी अनेक वर्षापूर्वीची यात्रेची परंपरा प्रथमच खंडित होत आहे. आसू येथील ग्रामदैवत काळभैरवनाथ एक जागृत देवस्थान असून यात्रेला फलटण तालुक्यासह अनेक तालुक्यातून भाविकभक्त दर्शनासाठी येतात. आसू या ठिकाणी काळ भैरवनाथ यात्रा उत्सव मोठा साजरा होत असतो. या यात्रा उत्सवात कुस्तीचे आखाडे तसेच तमाशा या गोष्टीचा आनंद घेतला जात असतो व मोठमोठाले पाळणे येत असतात तसेच आसू येथील मानाची काठी असून ही काठी पिंपरद ला जाऊन आल्यानंतर आसू येथील यात्रेस सुरुवात होते.
श्री काळभैरवनाथ देवाची दि.२८,२९ व ३० रोजी होणारी यात्रा शासनाच्या आदेशानुसार व आसू ग्रामपंचायत आणि यात्रा कमिटीच्या निर्णयानुसार ग्रामस्थांच्या व भाविक भक्तांच्या आरोग्याची काळजी घेत यावर्षीचा यात्रा-उत्सव रद्द करण्याचे ठरवले आहे. तसेच मंदिरात फक्त धार्मिक विधी पूजा होणार आहे दर्शन साठी कोणालाही परवानगी नाही त्यामुळे अनावश्यक गर्दी करू नये तरी सर्व भाविक भक्तांनी याची नोंद घ्यावी. घरातील देवाला नैवेद्य दाखवावा व देवाच्या लग्नाची वेळ संध्याकाळी सात वाजता आहे तरी सर्व ग्रामस्थांनी मंगलाष्टका ऐकल्यानंतर घरून अक्षदा टाकाव्यात अशी विनंती आसू ग्रामपंचायतीने व काळभैरवनाथ यात्रा उत्सव कमिटीने सर्व ग्रामस्थांना व भाविक भक्तांना विनंती केली आहे