फलटण प्रतिनिधी -राज्य सरकारने शेती व्यवसाय करण्यासाठी परवानगी दिली आहे,मात्र नगरपालिका प्रशासन व पोलीस कारवाईमुळे अनेक अडचणी येत आहेत,ग्रामीण भागातील शेतकरी शहरात शेती विषयक साहित्य खरेदीसाठी आले असता त्यांच्यावर कारवाई केली जात आहे, या मुळे येथील नगरपालिका व पंचायत समिती व कृषी विभाग यांनी संयुक्त पणे शेतकऱ्यांना या कारवाईचा त्रास होऊ नये म्हणून एक कमिटी करून शेतीसाठी लागणाऱ्या वस्तू मिळाव्यात यासाठी एक हेल्पलाईन सुरू करून शेतकऱ्यांना सहकार्य करावे व या कारवाईपासून संरक्षण करावे अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक व सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर उर्फ माऊली सावंत यांनी प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांचेकडे दूरध्वनी द्वारे केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिकारी व त्यांचे कर्मचारी अगदी आपल्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणे सर्व फलटण शहर व ग्रामीण भागातील लोकांची काळजी घेत आहेत, त्या बद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार, व त्यांना खूप खूप धन्यवाद द्यावेत तेवढे कमीच पडतील मात्र सध्या राज्य सरकारने काही अटी व शर्ती लावून शेती व शेतकऱ्यांना व्यवसायात सूट/परवानगी दिली आहे, त्या मुळे शेती व शेतीशी निगडित खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना ग्रामीण भागातून फलटण शहरात यावे लागत आहे,तर शेकडो शेतकरी हे राहायला फलटण शहरात मात्र शेती ग्रामीण भागात आहे,या शेतकऱ्यांना पोलीस अधिकारी व त्यांचे कर्मचारी अनेक शहरातील विविध भागात त्या शेतकऱ्यांना अडवत आहेत अशा शेतकऱ्यांना अडवू नये किंवा त्यांचेवर कायदेशीर कारवाई करू नये,त्यांना शेती करण्यासाठी व दुकानातुन शेती विषयक वस्तू खरेदी करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांची वाहने जप्त करू नयेत, तथापि त्यांचे सातबारा पाहून त्यांना प्रांताधिकारी किंवा तहसीलदार यांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना ओळखपत्र द्यावित व त्यांना शेतीची कामे करण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक तथापि सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर उर्फ माऊली सावंत यांनी केली आहे.
सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी शिवाजी जगताप,तहसीलदार आर.सी.पाटील,गटविकास अधिकारी अमिता गावडे व पोलीस अधीक्षक तानाजी बरडे,मुख्याधिकारी प्रसाद काटकर,शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप पोमन हे लोकांचे आरोग्य अभाधित राहावे या साठी चांगले काम करीत आहेत, या सर्व अधिकारी वर्गाचा समनव्य ही चांगला आहे, दुदैवाने तरडगाव चा एक रुग्ण सोडला असता कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी अतिशय उपयुक्त काम या सर्वच अधिकाऱ्यांनी केले आहे, व ते त्यांनी फलटण शहरासह ग्रामीण भागातील लोकांना या कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी महसूल विभाग, आरोग्य विभाग यांनी योग्य नियोजन केले,तसेच कडक निर्बंध घालून लोकांना घरी राहा सुरक्षित राहा असे सांगत त्यांना या कोरोनाच्या संसर्गापासून दूर ठेवले,त्या मध्ये काही अपवादात्मक लोक सोडता या नियोजनाला लोकांनीही चांगला प्रतिसाद दिला,मात्र सध्या राज्य सरकारने घेतलेला निर्णय व सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या निर्णयात तफावत जाणवत असून त्याचा फटका शहरातील व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना बसत असून तो बसू नये त्यासाठी शेतकरी प्रतिनिधी व अधिकारी यांनी काही नियम व अटी शर्ती घालून तसे एक निवेदन जिल्हाधिकारी यांना सादर करून त्यांना शेती व शेती विषयक कामांना मुभा/परवानगी मिळावी यासाठी प्रयत्न करावेत व त्या साठी शेतकऱ्यांना सातबारा पाहून महसूल विभागाने ओळखपत्र द्यावीत व त्यांना सहकार्य करावे असे मत ज्ञानेश्वर उर्फ माऊली सावंत यांनी केली आहे.
याच बरोबर फलटण नगरपालिका यांनी शहर सुरक्षित राहावे यासाठी काही कडक पावले उचलली आहेत, त्या साठी त्यांनी एका कुटुंबातील एकालाच चार दिवसातून बाहेर पडण्याची परवानगी दिली आहे, या मुळे शहरात ग्रामीण भागातील अनेक शेतकरी येत आहेत त्यांना मात्र हे पास उपलब्ध नाहीत, या साठी मुख्याधिकारी प्रसाद काटकर व गटविकास अधिकारी अमिता गावडे यांनी एक शहर (नगरपालिका)व ग्रामीण(पंचायत समिती) अशी दोघात मिळून एक कमिटी करावी व शेतकऱ्यांना शेतीविषयक व शेतीसाठी उपयुक्त असलेल्या वाहनांच्या बाबतीत जी खरेदी करावी लागते त्या साठी शेतकऱ्यांना एक हेल्पलाईन उभी करून त्या लोकांना त्या वस्तू मिळण्यासाठी/उपलब्ध व्हाव्यात याची व्यवस्था केल्यास शेतकऱ्यांना काही अडचण येणार नाही असेही सावंत यांनी सांगितले असून या मुळे गर्दी ही होणार नाही, त्या शेतकऱ्यांची शेतीची कामे खोळंबणार नाहीत, व पोलीस कारवाई ही होणार नाही व त्यांच्यावर कायदेशीर कारवाई ही होणार नाही अशी मागणी ज्ञानेश्वर उर्फ माऊली सावंत यांनी केली आहे.
चौकट – शेतकऱ्यांना या बंद च्या पार्श्वभूमीवर अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे, या साठी शुक्रवार दि.24 रोजी पंचायत समितीच्या सभागृहात सर्व पंचायत समितीच्या सदस्यांची सोशल डिस्टनसिंग ठेवत महत्वाची बैठक आयोजित केली असून शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी प्रयत्न करू – श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर सभापती पंचायत समिती फलटण
चौकट – हेल्पलाईन ची संकल्पना चांगली आहे, या मुळे शेतकरी व कृषि विषयक खरेदी करणे सोपे होईल,व शेतकऱ्यांना त्यांची शेतीविषयक कामे करण्यासाठी साहित्य उपलब्ध होईल, या बाबत मी मुख्याधिकारी यांच्याबरोबर चर्चा करून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे – अमिता गावडे गटविकास अधिकारी फलटण पंचायत समिती
चौकट – शेतकऱ्यांना नगरपालिका नियमांची अडचण येणार नाही, या बाबत आमची सहानुभूतीची भूमिका असेल,फलटण शहर कोरोनाच्या संसर्गापासून दूर राहण्यासाठी आम्ही कडक उपाय योजना केल्या आहेत, मात्र शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे साहित्य उपलब्ध करण्यासाठी संबंधित दुकानदार यांना ओळखपत्र देणार आहोत व पंचायत समिती कडून प्रस्ताव आल्यास त्यांना सहकार्य करू – प्रसाद काटकर मुख्याधिकारी फलटण नगरपरिषद
चौकट- कोरोना पासून संरक्षण व्हावे यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न सुरू आहेत मात्र शेती,ट्रॅक्टर यासाठी लागणारे साहित्य घेण्यासाठी शहरात जावे लागते आहे या साठी शेतकऱ्यांना अडवू नये – दशरथ बोबडे (आबा) शेतकरी घाडगेवाडी ता.फलटण