लॉकडाऊन च्या काळात तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीचा मोफत फिरता दवाखाना…

फलटण: फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीने “अन्नदाता सन्मान योजना’ अंतर्गत कोरोना विषाणू संसर्ग (कोविड 19) च्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी लोकडाऊन च्या काळात आरोग्यविषयक सोयी सुविधांची गैरसोय होऊ नये,अवेरनेस वाढावा,म्हणून बाजार समितीच्या वतीने विनामूल्य फिरता दवाखाना सुरु करणेत आला आहे.सदरील उपक्रमाची माहिती बाजार समितीचे सचिव शंकरराव सोनवलकर यांनी दिली.
 बाजार समितीचे चेअरमन मा.श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांची सूचना मागील दोन वर्षांपूर्वी फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीच्या वतीने महाराजा मालोजीराव नाईक निंबाळकर कार्डियाक स्नेकबाईट अम्ब्युलन्स सुरु करणेत आली आहे.एक्सपर्ट डॉक्टरांची टीम तयार करुन कृषि उत्पन्न बाजार समितीची कार्डियाक अम्ब्युलन्स फिरत्या दवाखान्यासाठी कन्व्हर्ट करता येईल.याकरिता प्रांताधिकारी मा. शिवाजीराव जगताप याना बाजार समितीच्या सदरील प्रस्तावाची माहिती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.सोशल डिस्टंनसिंग पाळून व आरोग्यविषयक सर्वतोपरी काळजी घेऊन बाजार समितीने फिरता दवाखाना सुरु करावा अशी सूचना प्रांताधिकारी यांनी केली.
फलटण तालुका केमिस्ट व ड्रॅगिस्ट असोसिएशन यांचेकडून मोफत औषधे फलटण तालुका केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशन चे अध्यक्ष श्री राहुल मोहिते व त्यांचे सहकारी आणि श्री.मिलिंद नेवसे यांनी पुढाकार घेऊन अत्यंत कमी वेळेत सर्व मेडिकल चालक याना आवाहन करुन बाजार समितीच्या सदरील उपक्रमास विनामूल्य औषधे उपलब्ध करुन दिली आहेत.
डॉक्टरांची टीम आणि सोबत बाजार समिती स्टाफ
डॉ. वल्लभ कुलकर्णी आणि डॉ.धनश्री शिराळकर यांनी याकरिता सविस्तर नियोजन केले असून अत्यंत दर्जेदार अशी वैद्यकीय सेवा देत आहेत.बाजार समिती च्या वतीने PPE किट,मास्क,सॅनिटायझर उपलब्ध करून देणेत आले आहे.यासाठी बाजार समितीने स्वतंत्र स्टाफ नियुक्त केला आहे.
 सोशल डिस्टन्सिंग चे पालन
सदरील उपक्रम राबवित असताना अम्ब्युलन्स सोबत बाजार समिती ची स्पीकर लावलेली बोलेरो गाडी आहे.प्रचार प्रसिद्धी ची गाडी आणि अम्ब्युलन्स संबंधित गावात पोहोचल्यानंतर गावातील नागरिकांना मोफत वैद्यकीय सेवेचा लाभ घेणेकरिता आवाहन केले जात आहे.तपासणी व औषधे दिलेल्या लोकांची नोंद स्वतंत्र रजिस्टर ला ठेवणेत येत आहे.वैद्यकीय तपासणी साठी आलेल्या प्रत्येकाने मास्क वापरणे बंधनकारक आहे.संबंधित ठिकाणी बाजार समितीच्या वतीने हँड सॅनिटायझर ची सोय करणेत आली आहे.
*ग्रामसेवक,तलाठी,सरपंच,पोलीस पाटील,आशा वर्कर्स,अंगणवाडी सेविका,सदस्य APMC आरोग्य समिती आणि बाजार समिती चा योग्य समन्वय*
शक्यतो  आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध नसलेल्या गावाची निवड बाजार समितीच्या वतीने करणेत येत आहे.संबंधित गावचे सरपंच ग्रामसेवक,तलाठी,कृषि  सहाय्यक,आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका यांना आदल्या दिवशी बाजार समितीच्या सदरील उपक्रमाबाबत माहिती दिली जात आहे.आवश्यकते नुसार  कोरोना संसर्ग च्या पार्श्वभूमीवर संबंधितांची माहिती आरोग्य विभागाला देणेत येत आहे.
बाजार समितीचा उपक्रम कौतुकास्पद
फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीने शेतीमाल खरेदी विक्रीचे सुयोग्य नियोजन केले आहे.तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी मोफत फिरता दवाखाना सुरु करण्याचा फलटण बाजार समितीचा उपक्रम नाविन्यपूर्ण,विधायक आणि  कौतुकास्पद असल्याचे मत सहाय्यक निबंधक श्री.सुनील धायगुडे यांनी व्यक्त केले आहे.
मार्केट यार्ड मध्ये आवक आणणारे शेतकरी,अडते ,खरेदीदार हमाल मापाडी यांची होणार आरोग्य तपासणी
मार्केट यार्ड फलटण येथे अनावश्यक गर्दी टाळून रोजच्या रोज शेतमाल खरेदी विक्रीचे व्यवहार होत आहेत.मार्केटयार्डमध्ये कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत.आवक आणणारे शेतकरी,अडते खरेदीदार आणि इतर यांची सदरील दवाखान्यामूळे वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करणे शक्य होणार आहे.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!