बारामती: विविध व्यासपीठावर आपली कला सादर करून मनोरंजन, सामाजिक प्रबोधन करणाऱ्या बारामती मधील कलाकारांना जीवनावश्यक वस्तू देऊन लॉकडाऊन च्या काळात बारामती येथील अखिल मराठी साहित्यिक, कला व आरोग्यदायी परिषदेचे अध्यक्ष बी. डी. गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी मदत करून सामाजिक बांधीलकी जोपासली आहे. या वेळी परिषदेचे खजिनदार विद्याधर गायकवाड,मराठी चित्रपट महामंडळ चे भरारी पथक सदस्य दीपक महामुनी आदी मान्यवर उपस्तीत होते .बारामती तालुक्यातील विविध लोक
कलावंत,नाट्य,कविता,भारुड, गोंधळी,तमाशा आदी क्षेत्रातील 50 कलाकारांना या महिन्यातील जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या.राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून या कलाकारांना लॉक डाऊन उठल्यावर सुद्धा पुढील सहा महिने तरी शासनाने मदत करावी अशी मागणी सुद्धा निवेदना द्वारे केली असल्याची माहिती बी.डी. गायकवाड यांनी या वेळी दिली.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ चे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला असून राज्यातील प्रत्येक तालुक्यात सोशल डिस्टनिग पाळून सदर कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे विद्याधर गायकवाड यांनी सांगितले.