फलटण : ‘कोरोना’मुळे उद्भवलेल्या जागतिक संकटाची जाणीव थोरा-मोठ्यांबरोबर चिमुकल्यांनाही होताना दिसत असून याच जाणीवेतून येथील ब्राह्मण गल्ली येथील रहिवासी कु.आदिती गणेश पाटणे हिने आपला वाढदिवस साजरा न करता वाढदिवसाच्या खर्चाची रक्कम ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठी फलटण तहसिलदारांकडे सुपूर्द केली.
कु.आदिती हिचे वडील गणेश विश्वासराव पाटणे हे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कार्यरत आहेत. आदितीच्या या योगदानाबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.