कु.रूपाली पाटोळेचा चांदणं कविता संग्रह प्रसिद्धध

कु.रुपल राजेश पाटोळे इ.८वी (कवयत्री) दि.२८ फेब्रुवारी २०१९ चा दिवस होता,सातारा जिल्हा परिषद सातारा व पंचायत समिती फलटण, यांचे मार्फत शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम अंतर्गत
फलटण येथील विभागीय बाल शिक्षण परिषद, कुमार- साहित्य व कवी संमेलन कार्यक्रम आयोजित केला गेला होता. यावेळी रुपलने ही सुंदर कविता सादरीकरण केले होते. मला ते खूप भावलं कारण एवढ्या कमी वयात इतक्या उच्च दर्जाची स्वनिर्मित कविता याचं विशेष वाटलं. तिचं त्याच ठिकाणी मी कौतुक केले. कार्यक्रम संपल्या नंतर रुपल व तिच्या आई बाबांनी तिचा स्वलिखित चांदणं नावाचा कविता संग्रह मला भेट दिला. माझ्यासाठी तो फक्त कविता संग्रह नव्हता तर ती एक खूप मोठी अनमोल भेट वाटली.खूप कमी वयात तिला असणारी लिहण्याची चिकाटी कौतुकास्पद होती .फक्त तू लिहित रहा ‘एवढचं त्या वेळी रुपल ला सांगितलं व तिच्या कविता प्रवासाला शुभेच्छा दिल्या.त्या वेळी तो काव्य संग्रह मी काहीसा ओझरता वाचला.पण आज तो पुन्हा वाचवासा वाटला ,याचं कारण असं की ‘या सुट्टीच्या काळात मी सुद्धा काही कविता लिहिण्याचा प्रयत्न करू लागलो .त्यावेळेस बऱ्याच काव्य रसिक मित्रांचे फोन आले त्यावेळी काहींनी सांगितले की सर तुम्ही कविता करत आहात आणि पहिल्याच प्रयत्नात खूप छान करत आहात. तुम्ही काही निवडक कविता संग्रह वाचा,त्याचा फायदा तुम्हाला होईल आणि मी एका काव्य संग्रहाची निवड केली ती मला भेट मिळालेल्या चांदणं या रूपल च्या काव्य संग्रहापासून…………
*कु. रूपल राजेश पाटोळे . इ.८ वी स्वलिखीत ” चांदणं “.
अगदी बालपणा पासून विविध कविता करण्यासाठी रूपलने जणू शब्दरत्नांच्या खाणीतून अलगद शब्दरूपी एक एक पुष्प वेचून आपली प्रगल्भता जीव ओतून प्रत्येक कविता मध्ये दाखवली व त्या पासून सुंदर अशी चांदणं नावाची पुष्पमाला तयार केली .आणि त्यातून काव्यप्रेमीला त्याचा सुगंध अनुभवण्याची प्रचिती आली. या काव्यसंग्रहात सुमारे ४३कविता आहेत. प्रत्येक कविता ही नावीन्यपूर्ण व तिच्या बालवयात ही तिच्या अंगी असणारी कल्पकता,नावीन्यपूर्णता मनाचा वेध घेते,हे प्रकर्षाने जाणवते. चांदणी बरोबरचं खेळणे,परीला घरी बोलावणे,दिवाळी किल्ल्या,शाळेची आवड, स्वप्नाच्या जगात, प्राण्यांचे लग्न ,महाराष्ट्राचे आराध्य दैवत छ. शिवाजी महाराज इ.अनेक विषयाला या बालमनाने उत्तुंग असा स्पर्श केला आहे.प्रत्येक कविता वाचताना डोळ्या समोर चित्रण उभे राहते.
शब्द तूच माझा देव्हारा,
शब्द तूच माझा किनारा,
शब्द तूच माझ्या मनाला,
लाभलेला एक आसरा,
असं रुपल च्या कविता पाहून माझ्या मनाला मनापासून वाटतं. रुपल ची प्रत्येक शब्द फेक तिच्या काव्य निर्मितीला वेगळ्या उंचीवर घेऊन जाते.रुपलच्या काव्य प्रवासाला अनेक पुरस्कार तिला मिळाले आणि भविष्यात ही मिळतील.तिच्या या प्रवासात तिला आई प्रतिष्ठाण वाठार निंबाळकर कडूनही जिल्हास्तरीय आई सन्मान पुरस्कार-२०१९ देऊन गौरविण्यात आले आहे. आणि आजपर्यंत आई प्रतिष्ठान कडून देण्यात आलेल्या पुरस्कारा पैकी सर्वात कमी वयात पुरस्कार मिळण्याचा मान तिला मिळालाआहे, रुपल च्या आई वडिलांनी तिची काव्य प्रतिभा ओळखून तिला साथ दिली,प्रेरणा दिली त्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक.रुपल च्या हातून भविष्यात अनेक काव्य साहित्य लिखाण व्हावे.व आम्हा सर्वांना वाचण्यासाठी एक पर्वणीच ठरावी हीच अपेक्षा.तिच्या भावी वाटचालीस आभाळभर
शुभेच्छा!!!
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!