बारामती: लॉकडाऊन च्या काळात हातावरचे पोट असणारे मजूर,कामगार आदी ना नगरसेवक अतुल बालगुडे मित्र परिवार च्या वतीने मोफत जीवनावश्यक वस्तूचे (तांदूळ,तेल,गहू,साखर,डाळ,
साबण व इतर वस्तू) वाटप करण्यात आले.ढोर कॉलनी,देसाई इस्टेट,माने वस्ती व जळोची गावठाण परिसरातील 350 कुटूंबियांना सदर वस्तूचे वाटप करण्यात आले.सदर वाटपाचा शुभारंभ बारामती नगरपरिषद चे मुख्यधिकारी योगेश कडूस्कर यांच्या हस्ते करण्यात आले.
“लॉक डाउन मुळे रोजगार नाही ,उपासमार होत आहे अशा कुटूंबियांना सदर वाटप करण्यात आले असून समाज्याचे देने आपन लागतो या भावनेतून व सामाजिक जाण व भान जपत मदत करत असल्याचे नगरसेवक अतुल बालगुडे यांनी सांगितले.या वेळी देसाई इस्टेट,ढोर कॉलनी व जळोची परिसरातील अनेक मान्यवर व विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्तीत होते. गरजू ना वेळेत मिळालेल्या मदती मुळे त्यांनी समाधान व्यक्त केले.