आसू/वार्ताहर-अजित निकम
कै. श्रीमंत यशवंतराव आप्पासाहेब निंबाळकर खर्डेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून प्रतिष्ठानच्या माध्यमातून गरीब व गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. आसू येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी कातकरी समाजाची काही कुटुंब उदरनिर्वाहासाठी आली असून लॉकडाऊनच्या काळामध्ये त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन दोन दिवस कातकऱ्याची वस्तीतील कुटुंबे भुकेने व्याकूळ झालेली होती. ही गोष्ट काही तरुणवर्गाच्या लक्षातआली.त्यांनी त्या कातकरी वस्तीवर जाऊन त्यांची चौकशी केली असता या लोकांवर उपासमरीची वेळ आली आहे हे समजले त्यामुळे आसूतील या तरुण वर्गाने ठरवले की श्रीमंत दादाराजे खर्डेकर यांच्या जयंती निमित्त आपण त्यांच्यासाठी काहीतरी करू या भावनेतून या समाजातील लोकांना संसार उपयोगी किराणा वस्तूंची भेट देऊन त्यांच्या दुःखात श्रीमंत दादाराजे खर्डेकर ग्रामविकास प्रतिष्ठाठानच्या माध्यमातून थोडी फार मदत देऊन त्यांच्या संसाराला हातभार लावण्यास मदत केले.
लॉकडाऊन च्या काळात सामान्य कुटुंबांचे परवड होऊ नये म्हणून सरकार प्रयत्नांची पराकाष्टा करत आहे. त्याचबरोबर अनेक सामाजिक संस्था आपल्या संस्थेमार्फत मदतीचा हात पुढे करत आहेत. त्याच प्रकारे आसू येथील श्रीमंत दादाराजे खर्डेकर ग्रामविकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून गरीब गरजू लोकांना अत्यावश्यक सेवांचे वाटप करण्यात आले.सध्या कोरोना चा होत असलेला प्रादुर्भाव रोखण्यासाठी पूर्ण देशात लॉकडाऊन केला आहे. तसेच महाराष्ट्र सरकारने चौदा एप्रिलची मुदत वाढवून ती तिस एप्रिल केली आहे.
समाजातील काही लोकांना रोज काम करून आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागत होता. तो लॉकडाऊन मुळे अशा लोकांचा रोजगार बंद पडून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलीे आहे. त्याचबरोबर त्यांना शासनामार्फत मदत मिळेल तेव्हा मिळेल, पण गावातील इतर लोकांना शासनाकडून अंत्योदय योजनेतुन सरकरमान्य रेशनिग दुकानातून त्यांना मिळाले आहे.पण या कातकरी कुटुंबानच्या उपासमारीची तीव्रता पाहता आसू ग्रामपंचायत सरपंच व सदस्य तसेच ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी व तरुण वर्गाने तसेच प्रतिष्ठानच्या सदस्यांनी मिळून प्रतिष्ठानच्या माध्यमातून गरजू कुटुंबीयांना गहू,तांदूळ ,तेल ,मीठ, तिखट, साखर ,चहा,डाळ, साबण इत्यादी. अत्यावश्यक वस्तूंचे किट बनवून त्या गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचवण्याचे काम केले आहे. या गरजू लोकांना मदतीचा हात मिळताच त्यांनी आसू ग्रामपंचायतीचे तसेच गावातील लोकांचे व प्रतिष्ठानचे आभार मानले.