*"सोसियल डिस्टन्स चे नियम पाळून वाहण्यात आली महापुरुषाला आदरांजली!"*

जाधवनगर: आज सकाळी मौजे जाधवनगर येथे  ग्रामस्थ तसेच महात्मा फुले सामाजिक सेवा प्रतिष्ठान जाधवनगर यांच्या संयुक्त विद्यमाने सोसियल डीस्टन्स तसेच लॉकडॉउन चे सर्व नियम पाळून फक्त तिन लोकानी सोशल डिस्टन्स पाळून महात्मा फुले यांच्या प्रतिमेला आदरांजली वाहण्यात आली.
           दरवर्षी जयंती च्या निमित्ताने विविध उपक्रम जाधवनगर येथे राबविले जातात. तसेच जयंती च्या दिवशी ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षा देऊन यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्याचे मान्यवरांच्या हस्ते सत्कार घेण्यात येतात. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या गावातील युवकांच्या समोर आदर्श घालून देण्याचा आमचा प्रयत्न असतो असे श्री जाधव यांनी सांगितले. परंतु यंदाच्या वर्षी कोरोना सारख्या रोगाच्या जागतिक संकटामुळे असा कार्यक्रम घेता न आल्याची खंत ही प्रतिष्ठान चे अध्यक्ष यांनी बोलून दाखविली. *”ज्या जोतिबा आणि सावित्रीमाईनी प्लेग सारख्या महामारी च्या वेळी संपूर्ण समाजाला आधार देत एक आदर्श घालून दिला, अशा दाम्पत्याला पुजण्याचे भाग्य आम्हास मिळाले आहे”,* अशी भावना मनात ठेवून आजही महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार आणि फुले अर्पण करून कोरोना आजाराशी दोन हात करण्यासाठी समाजाचे मनोबल वाढावे या साठी मनोभावे वंदन करण्यात आले.
           *सोसियल डीस्टन्स* चे सर्व नियम पाळत सकाळी ग्रामपंचायतीचे कर्मचारी श्री संजय जाधव यांनी पुढाकार घेऊन सर्व व्यवस्था केली. *प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री दादासो रासकर, आप्पासाहेब जाधव आणि सरपंच श्री सतीश जाधव  एवढ्याच लोकानी साजरी केली तेहि सोशल डिस्टन्स राखून  श्री संत सावता माळी मंदिरात जाऊन महात्मा फुले यांच्या प्रतिमेला आदरांजली वाहिली.* यावेळी युवा नेते सोमनाथ रासकर मंदिरात जाऊन संत सावतामाळी आणि महात्मा फुले यांची मनोभावे पूजा केली. *देशाचे पंतप्रधान तसेच राज्याचे मुख्यमंत्री यांनी घालून दिलेल्या कुठल्याही नियमाचे उल्लंघन न करता महात्मा फुले यांची जयंती अशा प्रकारे साजरी करून जाधवनगर ग्रामपंचायतीने एक आदर्श घालून दिला आहे.*
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!