गोरगरीबांच्या मदतीला धावले के.बी.एक्स्पोर्ट

फलटण प्रतिनिधी – फलटण शहर व तालुक्यातील कोणत्याही प्रकारची अडचण असली की तन, मन,धनाने सहकार्य करणाऱ्या के.बी.एक्स्पोर्टस ने या बंद च्या पार्श्वभूमीवर गोरगरीब लोकांना संसारोपयोगी(किराणा व इतर) साहित्य देऊन मदतीचा हात दिल्याने संचालक सचिन यादव व कंपनी मुळे अनेक गोरगरिबांना मदत झाली आहे.
सध्या देशामध्ये कोरोना या आजारामुळे आणीबाणीचा प्रसंग निर्माण झाला आहे,देशामध्ये जवळपास सर्व उद्योगधंदे बंद असल्यामुळे कर्मचारी, कामगार व रोजंदारीवर काम करत असणार्‍या कुंटुंबाला दोन वेळच्या अन्नाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
के.बी. एक्सपोर्टचे मालक कौशल खक्कर व संचालक सचिन यादव यांनी सामाजिक जबाबदारी घेत स्वतःच्या 200 हुन अधिक कर्मचारी वर्गास पूर्ण पगार देत दिलासा तर दिलाच आहे,तसेच रोजंदारीवर काम करणार्‍या गरीब लोकांना मदत करण्याचे आवाहन आपल्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांना केले आहे.
त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्व कर्मचारी वर्गाने एक दिवसाचा पगार या कार्यासाठी दिला असून त्यामध्ये आपल्या कंपनीतर्फे आर्थिक भरघोस मदत वाढवुन समाजामध्ये अनेक कष्टकरी व मजुर वर्गाची अडचण लक्षात घेवुन फलटण तालुक्यातील रोजंदारी वरती काम करत करणार्‍या एक हजार कुटुंबांना अत्यावश्यक असणार्‍या वस्तु के.बी. एक्सपोर्टच्या व के.बी. फौंडेशन मार्फत फलटणचे प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांच्या यादीनुसार देत, त्या गरजुंना सदरचे किट स्वतः तहसील कार्यालयात दिल्या व इतर अनेक लोकांना घरपोच करण्याचा के.बी. एक्सपोर्टचे संचालक सचिन यादव यांचा मानस असून त्या प्रमाणे काम ही सुरू केले आहे.
फलटण उपविभागाचे उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप, प्रभारी तहसीलदार आर. सी. पाटील व पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सौ. अस्मिता गावडे-पवार यांनी दिलेल्या यादीनुसार के. बी. एक्सपोर्टच्या अधिकारी वर्गाने या मध्ये स्वत: लक्ष दिले आहे. शासकिय अधिकार्‍यांनी के. बी. एक्सपोर्टसच्या टीम सोबत वाटप करण्यास देखील मान्यता दर्शवली आहे. यामुळे सदरची मदत अत्यंत योग्य ठिकाणी पोहचणार आहे.
काल दिनांक 5 एप्रिल रोजी या मोहिमेचा शुभारंभ करून अधिकारगृह फलटणच्या आवारात अनेक गरजु कुटुंबांना मदत प्रदान करण्यात आली. फलटण उपविभागाचे उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप, प्रभारी तहसीलदार आर. सी. पाटील, पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सौ. अस्मिता गावडे-पवार, के. बी. एक्सपोर्टस तर्फे संदीप शिंदे, गणेश निकम, योगेश यादव, हेमंत खलाटे, समीर खिलारे, अ‍ॅड.संदीप लोंढे व के. बी. एक्सपोर्टचा कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
फलटण उपविभागाचे उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप, प्रभारी तहसीलदार आर. सी. पाटील, पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सौ. अस्मिता गावडे-पवार यांनी के. बी. एक्सपोर्टने केलेल्या मदतीबद्दल आभार मानले व इतरांनी के.बी.एक्स्पोर्टस चा आदर्श घेऊन गोरगरीब लोकांना मदत करावी असे आवाहन केले आहे.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!