'कोरोनाचा संसर्ग' रोखण्यासाठी व्हेरिटास इंजिनिअरिंग चे सहकार्य

बारामती: परप्रांतीय मजूर व कामगार स्थलांतर करताना ‘कोरोना संसर्ग’ प्रत्येक्ष अप्रत्यक्षपणे नकळतपणे  वाढू नये म्हणून राहत्या घरीच किराणा व जीवनावश्यक वस्तू लॉक डाऊन उठे पर्यंत  पोहच करू परंतु बारामती सोडू नका असा सल्ला देऊन मजूर व कामगारांचे स्थलांतर थांबवून बारामती एमआयडीसी मधील व्हेरिटास इंजिनिअरिंग ने आदर्शवत कार्य केले आहे.
मुंबई ,नाशिक  पुण्या सारख्या शहरातील कंपन्या व कारखान्यातील परप्रांतीय कामगार कुटुंबासमवेत आपल्या गावाला गेले आहे. बारामतीतील एमआयडीसीमधील व्हेरिटास इंजिनीरिंग कंपनी मात्र यास अपवाद ठरली आहे या कंपनीने त्यांच्याकडे काम करणाऱ्या तब्बल दोनशे परप्रांतीय कामगारांच्या कुटुंबांना धान्यासह किराणामाल व इतर जीवनाशवयक वस्तू  दिल्या आहेत त्यामुळे या कामगारांना लॉक डाऊन नंतर भटकंती करावी लागणार नाही व त्यांची उपासमार सुद्धा होणार नाही त्याचप्रमाणे त्यांच्या मूळ गावी जाण्याची ची इच्छा  सद्या तरी होणार नाही जर कदाचित स्थलांतर करताना गपचूप समूहाने प्रवास करताना नकळतपणे त्यांना कोरोना संसर्ग होऊ शकतो व त्या मजुरामुळे नंतर इतरांना संसर्ग होऊ नये  म्हणून ही काळजी घेतली आहे
व्हेरिटास इंजिनीरिंग अनेक वर्षापासून देशात मोठमोठे कारखाने उभे करत आहे त्यासाठी लागणारे लोखंडी खांब वेगवेगळे साचे तयार करावी लागतात बारामती एमआयडीसी या ठिकाणी हा कारखाना आहे या कंपनीत मेहनतीचे व कष्टाचे काम उत्तर प्रदेश आणि बिहारमधील मजूर व कामगार करतात  हे सर्वजण एमआयडीसी  परिसरात कुटूंबासह राहतात “लॉकडाऊन नंतर जीव धोक्यात घालून मूळ गावी जाऊ नये त्यामुळे लॉक डाऊन उठे पर्यंत जीवणावयशक वस्तू पुरवीत राहू  व सद्या राहत्या घरी सुद्धा शासनाच्या सूचनांचे पालन करत राहावा व सर्व जण लवकरच कोरोना मुक्त होऊ असाही आशावाद रोज मजूर व कामगाराला देत त्यांचा आत्मविश्वास वाढवत असतो ” असेही व्हेरिटास इंजिनिअरिंग चे चेअरमन दिलीपराव भापकर यांनी सांगितले.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!