जळोची गाव शंभर टक्के लोक डाऊन! पोलीस चा वाढता तान कमी करणार जळोची गाव!

बारामती:   बारामतीतील कोरणाची वाढती दहशत पाहता जळोची येथील युवकांनी एकत्र येत गावाच्या व शहराच्या सुरक्षेसाठी गावातील प्रमुख रस्ते 100% बंद करत नागरिकांना घरातून बाहेर न येण्याचे घरोघरी जाऊन आव्हान केले आहे. या आव्हानाला प्रतिसाद देत परिसरातील महिला ज्येष्ठ व तरुणांनी घरातून बाहेर न पडण्याची ग्रामदेवताची शपथ घेतली आहे. पोलीस प्रशासन व आरोग्य कर्मचारी यांच्यावरील वाढता तान कमी करण्याच्या हेतूने युवकांनी एकत्र येत पोलिस बांधवांना सहकार्य व मदत करण्याचे ठरविले आहे. मोकाट फिरणाऱ्या लोकांची यादी बनवून पोलिसांना व प्रशासनाला देण्याची युक्ती तरुणांनी गावासमोर मांडली व गावाने देखील एक मताने ठराव करून या युक्तीला मान्यता दिली. गावातील या भूमिकेचे प्रशासन स्तरावरून कौतुक होत आहे. गावातील तरुण घरोघरी जाऊन लोकांचे मनोबल वाढवत 
कोरोणासाठी लागणारा मदत निधी देखील जमा करून प्रशासनाकडे सुपूर्द करण्याचे युवकांनी ठरविले आहे.
तसेच गावातील प्रत्येक पाच युवक दररोज या कामासाठी पुढे येवून जनजागृती करण्याचे काम करणार आहेत.तसेच प्रशासनाने सांगीतलेले उपाय योजना सूचना गावातील नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे काम करत आहेत.
यावेळी गावातील प्रमुख पदाधिकारी व युवक उपस्थित होते. यावेळी सोशियल डिसटन्स देखील पाळला गेला.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!