बारामती:वार्ताहर बारामती एमआयडीसी येथील रविराज ऍग्रो प्रा. लि. यांच्यावतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परिसरातील पंधरा ग्रामपंचायतींना मोफत सॅनिटायझर चे वाटप करण्यात आले विविध 15 ग्रामपंचायतींना 750 लिटर वाटप करण्यात आले याप्रसंगी रविराज ॲग्रो चे चेअरमन अजित सस्ते, विक्रम थोरात,डॉ किशोर साळुंके त्याचप्रमाणे विविध ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच ग्रामसेवक व इतर पदाधिकारी उपस्थित होते. ” रविराज ऍग्रो सामाजिक बांधिलकी म्हणून रक्तदान शिबिर,वृक्षारोपण व गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटप करत असते, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स सामाजिक बांधिलकी म्हणून विविध उपक्रम राबवत आहेत ग्रामपंचायत च्या माध्यमातून नागरिकांसाठी सॅनिटायझर मोफत वाटप करत आहे व या नंतरच्या काळामध्ये अल्प दरामध्ये सॅनिटायझर उपलब्ध करून देणार आहे त्याच प्रमाणे परिसरातील गरजू परप्रांतीय मजुरांसाठी मोफत जेवणाची व्यवस्था करणार असल्याची माहिती अजित सस्ते यांनी दिली.