बारामती:वार्ताहर लॉकडाऊन च्या काळात बारामती परिसरातील नागरिकांना मनपसंत खरबूज उत्तम दर्जा व गुणवत्ता असणारी घरपोच मिळत नाही त्यामुळे शेतातील स्वच्छ, ताजी खरबूज शेतातच विक्री साठी ठेऊन ना नफा ना तोटा या तत्वावर विक्री करून मळद येथील झांबरे कुटुंबियाणी सामाजिक आदर्श निर्माण केला आहे.” नीरावागज, मळद येथील शेतातील खरबूज विक्री करताना बारामती शहर व तालुक्यातून नागरिक खरेदी साठी येत आहेत व विक्री करताना सोशल डिस्टन पाळले जात आहे व बाजारापेक्षा कमी किंमतीत सदर खरबूज विकले जातात नागरिकांना कमी किंमतीत उपलब्ध व्हावे व वेळेची बचत व्याहवी म्हणून सदर उपक्रम या वर्षी लॉकडाऊन च्या काळात सुरू केलेला आहे ” अशी माहिती शरद झांबरे यांनी दिली.
“ग्राहकांनी जर मोबाईल च्या माध्यमातून ऑर्डर दिली तर ऑनलाइन पैसे जमा केले व खरेदी ची मोठी संख्या असेल तर क्रेट च्या साह्याने घरपोच खरबूज केले जातात दर वर्षी मुंबई,पुणे आशा मोठ्या बाजार पेठा मध्ये सदर खरबूज पाठवीत असतो परंतु लॉकडाऊन मुळे या वर्षी बारामती परिसरातील ग्राहकांचा वेळ व पैसा वाचावा म्हणून सदर उपक्रम शेतातच सुरू केला असल्याचे” माळेगाव सहकारी साखर कारखाना चे माजी संचालक प्रगतिशील शेतकरी दादासाहेब झांबरे यांनी सांगितले.
फोटो ओळ: निरावागज येथील शेतात खरबूज विक्री करताना शरद झांबरे व सहकारी