वाठार (निं)- लॉकडाऊनमुळे गेले दहा दिवस ना रोजगार ना कमाई या परिस्थितीमुळे काही लोकांना जीवानावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे तसेच फलटण नगरपरिषद फलटणच्या आवाहानानुसार ,
आई प्रतिष्ठान वाठार निंबाळकर कडून आज १००० ऑरेंज क्रीम बिस्कीट पुडे देण्यात आले त्यावेळी अक्षयभैय्या तांबे , नगर परिषद अधिकारी वर्ग उपस्थित होते. तसेच शक्य होईल तशी अजून मदत करण्याचा प्रयत्न केला जाईल, व लवकरच आई प्रतिष्ठान वाठार निंबाळकर कडून *रक्तदान शिबीराचे आयोजन* करण्यात आले असल्याचे आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. गणेश तांबे यांनी सांगितले आहे. तसेच आजच्या कठीण परिस्थितीमध्ये सर्वांनीच अशा प्रकारच्या सामाजिक उपक्रमाद्वारे जास्तीत जास्त गरजू लोकांसाठी मदत करण्यासाठी पुढे आले पाहिजे, तसेच येणारे काही दिवस प्रत्येकाने घरामध्येच थांबून पदाधिकारी, प्रशासन, पोलिस, डॉक्टर, पत्रकार , सामाजिक संस्था या सर्वांना सहकार्य करण्याचे आवाहन ही श्री . गणेश तांबे यांनी केले आहे. श्री.गणेश तांबे हे एक प्राथमिक शिक्षक असून गेले २-३ वर्षापासून कोणतीही आर्थिक मदत न घेता ते विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात. या त्यांच्या कार्यात सर्व शिक्षक बंधू -भगिनी मित्र परिवार बहुसंख्येने सहभागी होत असतात. ते *चांगल्या कार्यात नेहमीच फलटणचे दैवत श्रीमंत रामराजे, श्रीमंत संजीवराजे, श्रीमंत रघुनाथराजे, युवा नेतृत्व विश्वजीतराजे यांची प्रेरणा व आदर्श घेत असतात*