बारामती: बाजारपेठेत किंवा घरोघरी शेत माल विक्री साठी नेल्यास सोशल ‘सोशल डिस्टन’ पाळले जाणार नाही व कोरोना संसर्ग वाढू शकतो तो होऊ नये म्हणून शेता शेजारील मोकळ्या जागेत शेत माल विक्री केली जात आहे या साठी सोशल मीडियाचा खुबीने वापर करत मळद येथील शेतकरी प्रल्हाद वरे यांनी अनोखा प्रयोग केला आहे व त्यास परिसरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.आपण घर बसल्या कलिंगड चे सहा प्रकार व टरबूज चे दोन प्रकार खरेदी करू शकता त्या साठी आपण पत्ता द्या व नेट बँकिंग,गुगल पे आदी माध्यमातून पैसे भरा काही वेळात आपल्याला नवीन फ्रेश कलिंगड व टरबूज मिळतील त्याच प्रमाणे आपल्याला प्रत्येक्ष पाहिजे असल्यास मळद येथील शेती ला भेट द्या,मालाची शेतातच पाहणी करा व हवा असा माल बाजारपेठ पेक्षा कमी किंमतीत खरेदी करा असा सुद्धा उपक्रम प्रल्हाद वरे यांनी सुरू केला आहे.
लॉकडाउन मुळे अनेक नागरिक घरी असल्याने सोशल मीडियावरील शेतकऱ्याने दिलेली हाक ऐकतात व खरेदी साठी ‘ओ’ देतात व ज्यांना शक्य आहे ते स्वतः शेतात जातात व पाहणी करतात व मोठ्या संख्येयने खरेदी करतात. लॉकडाऊन मुळे सदर माल मोठ्या शहरात पाठवण्यापेक्षा परिसरातील नागरिकांना कमी भावात सदर उच्च प्रतीचा शेतमाल वेळेत व ताजा स्वच्छ मिळावा वेळेची व पैस्याची बचत व्हावी या उद्देशाने हा उपक्रम सुरू केलेला असल्याचे प्रल्हाद वरे यांनी सांगितले.