कोरोना संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव सर्वत्र पसरु नये म्हणून संपूर्ण देशात संचारबंदी १४४ कलम लागू असल्यामुळे आपल्या फलटण शहरातील दररोज रोजंदारी व हमाली करुन जगणाऱ्या कुटुंबाची तसेच शहरातील भिक्षुक यांची उपासमार होऊ लागली आहे. ती उपासमार होऊ नये याकरिता त्यांना शिजवून अन्न वाटप करणे गरजेचे झाले आहे.
याकरिता फलटण नगर परिषद,फलटण ही पुढे सरसावली आहे. म्हणून फलटण शहरातील दानशूर व्यक्ती, व्यापारी, काँट्रॅक्टर, डॉक्टर्स, अथवा मान्यवर संस्था यांनी पुढे येऊन सढळ हाताने धान्य, भाजीपाला,अथवा किराणा माल, तेल, साखर, रवा, इत्यादी स्वरुपात मदत करण्याचे आवाहन फलटण नगर परिषदेचे *मुख्याधिकारी श्री.प्रसाद काटकर* यांनी केले आहे.
तरी मदत करणाऱ्या व्यक्ती, व संस्थांनी खालील नगर परिषद, आधिकारी यांच्याशी प्रत्यक्ष किंवा फोनवरुन संपर्क साधावा व नगर परिषद प्रशासनास सहकार्य करावे हि विनंती.
संपर्क – *तडवी साहेब* – 8805272722
*अनिल बिडकर* – 9960043677
*सुनिल गवळी* – 8087376981
*अनिकेत काकडे* -7020860160