मौजे खेड बु येथील पाटील नगर मधील बेघर वसाहतीतील वाजंत्री व्यवसाय करणाऱ्या डोंबारी समाज बांधवांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लग्न सराई, जत्रा आदी विविध कार्यक्रम लांबल्याने हाताला काम नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे व या वसाहतीत अजून कोणाची मदत पोहोचली नसल्याने तेथील बांधव चिंतेत असले बाबतची माहिती साथ प्रतिष्ठान ला समजताच साथ प्रतिष्ठानचे वतीने सदर वसाहत मध्ये घरोघरी जाऊन तांदूळ व डाळ पॅकेटचे वाटप केले याप्रसंगी साथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष कय्युम मुल्ला,मंगेश माने, दिपक बाटे,सुनील रासकर, स्वप्नील बुरुंगले पाटील आदी पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.