बारामती : संपूर्ण भारतात लॉक डाऊन जाहीर झाल्यानंतर या कालावधीमध्ये विनाकारण सार्वजनिक ठिकाणी फिरणार्या लोकांवर बारामती पोलिसांनी कारवाई केली होती याच वेळेस बारामती शहर व परिसरात जवळपास सर्व दुकानदार हे माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे पालन करून लॉक डाऊन मध्ये दुकानासमोर गर्दी करून देता ग्राहकांना दोन ग्राहकांमध्ये अंतर ठेवण्यासाठी सूचना देणे, काही व्यक्ती नियुक्त करणे, पट्टे आखून देणे, असे करताना आढळून आले आहेत.स्वतः पोलिसांनी दुकानासमोर पठ्ठे मारून दिले होते.
मात्र काही दुकानदार हे या आदेशाकडे दुर्लक्ष करून कोरोना व्हायरस चा संसर्ग रोखण्यासाठी कोणताही प्रयत्न न करता केवळ व्यवसाय करत होते ही बाब निदर्शनास आल्यानंतर बारामती पोलिसांनी खालील नमुद दुकानदार हे मा.जिल्हाधिकारी सो पुणे यांच्या आदेशाचे उल्लंघन करून दोन ग्राहकांच्या मध्ये सुरक्षित अंतर न ठेवता तसेच ग्राहकांनी सुरक्षित अंतर ठेवावे याकरिता कुठल्याही प्रकारच्या सूचना किंवा सुविधा न दिल्याने ग्राहकांची गर्दी केलेली मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे विरूद्ध भारतीय दंड विधान संहिता कलम 188 व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्यांना अटक करून पुढील कारवाई करण्यात येत आहे
त्यांची नावे खालील प्रमाणे आहेत
१. जय तुळजाभवानी पिठाची गिरण
शेखर राजेंद्र जाधव रा.तांदुळवाडी रोड, बारामती.
२.निलेश सुनील बनकर रा.पाटसरोड, बारामती साईनाथ जनरल किराणा स्टोअर्स पाटस रोड, बारामती
३. दिलीप चंद्रकांत मुथा रा.मार्केटयार्ड रोड बारामती
आनन्द ड्राय फ्रुटस पाणी गरम मसाला भिगवण चौक
४. शिवाजी बापूराव जानकर वय २९ वर्षे रा.बारामती वेलनेस फॉरेव्हर मेडिकल शॉप सिनेमा रोड बारामती
तरी सर्व दुकानदारांनी केवळ व्यवसायाकडे लक्ष न देता माननीय जिल्हाधिकारी यांचे आदेशाचे पालन करणे तसेच कोरोणाचा फैलाव होऊ नये याकरिता ग्राहकांना योग्य त्या सूचना सुविधा देणे हे त्यांचे कर्तव्य आहे अशा कालावधीमध्ये केवळ नफा हेच उद्दिष्ट न बाळगता देशाविषयी देशप्रेम समाजाची सेवा करण्याची हीच वेळ आहे हेही ध्यानात घ्यावी तसेच कायदा पाळणे हे सर्वांचेच कर्तव्य आहे
तरी त्याचे पालन करावे अशी विनंती व आवाहन सर्व व्यवसायिकांना बारामती पोलिसांतर्फे करण्यात येत आहे
त्याचे पालन न केल्यास सर्व संबंधितांवर गुन्हे दाखल होऊन त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात याबाबत सर्वांनी काळजी घ्यावी
(नारायण शिरगावकर)
उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती