फलटण : देशाअंतर्गत कोरोना बाधित रुग्ण आढळत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरुन व देशांतर्गत विमान प्रवासाद्वारे प्रवासी भारतात सर्वत्र प्रवास करीत आहेत. फलटण शहरात असे परदेशातील प्रवासी दाखल झाल्यास त्याबाबतची माहिती तात्काळ नगर परिषद कार्यालय, पोलीस स्टेशन, तहसिल कार्यालय व ग्रामीण रुग्णालयास दयावी. कोरोना विषाणुचा संसर्ग रोखण्याकरीता नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे, साबन व पाणी वापरुन हात स्वच्छ धुवावे, शिंकताना व खोकलतांना नाकावर व तोंडावर रुमाल धरावे, मांस व अंडी पुर्णपणे शिजवून व उकडून घ्यावे. लक्षणे आढळून आल्यास बेजवाबदारपणे वागू नये. आपल्या आरोग्याची काळजी घ्या व जवळील शासकीय रुग्णालयाशी तसेच राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष ०२०-२६१८७३९४ व जिल्हा परिषद आपत्कालीन क्रमांक ०२१६२- २३३०२५ तसेच टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक १०४ यावर व आरोग्य खात्यातील अधिकारी विनोद जाधव ९८६०८५०३५०, या क्रमांकावर संपर्क साधावा. व्हॉटस्ॲप व सोशल मीडीयावर प्रसारीत होणाऱ्या अफवांना बळी पडू नये. असे दिपाली निंबाळकर सार्वजनिक आरोग्य समिती सभापती फलटण नगर परिषद यांनी कळविले आहे.