फलटण :कोरोना या भयानक रोगामुळे आज आपली गोर-गरीब जनता तसेच मजुर वर्ग आणी व्रृध्द लोकांचे जीवन अगदी विस्कळीत झाले आहे.सर्व बाजारपेठा बंद आहे त्यामुळं अशा कित्येक लोकांवर आज उपासमारीची वेळ आली आहे,त्यामुळे त्यांना दिलासा मिळावा म्हणून
“व्रृध्दाआधार सामाजिक संस्था खुंटे” या संस्थेचे संस्थापक कु.रणजित संदीप धुमाळ तसेच उपाध्यक्ष सागर शिवाजी कुंभार आणी सामाजिक कार्यकर्त्या सौ.सारीका फत्तेसिंग कदम यांच्याकडुन आज या संस्थेमार्फत शासनाचे सर्व नियम व आदेश पाळुन अशा व्रृध्द तसेच गरीब लोकांना घरपोच भाजीपाला देवून त्यांना मदत करण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे आणि कोराना या रोगाविषयी त्यांना थोडक्यात माहिती दिली.
भविष्यात या संस्थेमार्फत अनाथ आणी व्रृद्ध लोकांना आर्थिक तसेच जीवन आवश्यक वस्तु देवून मदत करण्याबरोबरच झाडे लावणे, शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन, रक्त दान शिबीर,व्रृध्द लोकांना मोफत आरोग्य तपासनी असे विविध उपक्रम ही संस्था राबवणार आहे.