फलटण: कोरोणा विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 हा दिनांक 13 मार्च 2920 पासून inलागू केलेला आहे. या अनुषंगाने फलटण तालुक्यामध्ये माननीय श्री. शिवाजीराव जगताप, प्रांताधिकारी फलटण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पाटलांची टीम अतिशय सक्रियतेने कार्यरत असताना पाहायला मिळते
यामध्ये प्रामुख्याने फलटण तालुक्यातील सर्व यात्रा रद्द करणे: पोलीस पाटलांनी शासनाच्या या आदेशाची अंमलबजावणी करताना फलटण तालुक्यातील सर्व यात्रा जत्रा उरूस, ग्रामस्थांना योग्य मार्गदर्शन करून, रद्द केलेल्या आहेत,
तसेच सर्व मंदिर मज्जीद चर्च कार्यालय बंद करण्यासाठी तालुक्यातील सर्व धार्मिक स्थळे दर्शनासाठी बंद करण्यासाठी पोलीस पाटलांनी जी तत्परता व कार्यकुशलता दाखवली ती वाखाणण्याजोगी आहे.
त्याच प्रमाणे लग्न वास्तुशांती याबाबत सर्व ग्रामस्थांना शक्यतो घरच्यांच्याच उपस्थितीतकरण्याच्या सूचना देऊन त्याची शंभर टक्के अंमलबजावणी तालुक्यामध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळते हे काम सुद्धा पोलीस पाटलांच्या माध्यमातूनच पूर्णत्वास गेले आहे.
पोलीस पाटील संघटनेच्या माध्यमातून स्वखर्चाने 25000 हस्त पत्रके छापून प्रांत अधिकारी यांच्या हस्ते व तहसिलदार यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये या हस्त पत्रकांचे प्रकाशन करण्यात आले व नंतर तालुक्यातील प्रत्येक गावातील प्रत्येक घरापर्यंत व्यस्त पत्रकांच्या माध्यमातून हा विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनजागृती प्रत्येक पोलिस पाटलाने अतिशय प्रामाणिकपणे केल्याचे पाहायला मिळाले.
विदेशातून किंवा पुणे मुंबई शहरातून गावात आलेल्या लोकांना जिल्हाधिकारी यांनी दिलेला आदेश बजावून त्यांना आरोग्य अधिकाऱ्यांकडे तपासणीसाठी जाण्या बाबत सूचना देणे अशा लोकांची माहिती आरोग्य अधिकारी व महसूल प्रशासनाचे पोलीस पाटलांनी वेळच्या वेळी दिलेली आहे.
दिनांक 22 मार्च रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार संपूर्ण देशात जनता कर्फ्यू पाळण्यात आला त्याबाबत गावांमध्ये पोलीस पाटलांनी स्पीकर वरून तसेच सूचना फलकांच्या माध्यमातून जनजागृती केल्याचे पहावयास मिळते त्यामुळे फलटण तालुक्यात शंभर टक्के जनता कर्फ्यू पाळला गेला. यामध्ये सुद्धा महत्त्वाचा वाटा पोलीस पाटलांनी घेतलेल्या जनजागृती मोहिमेला जातो.
दिनांक 22 मार्च रोजी रात्री नऊ वाजल्यापासून माननीय जिल्हाधिकारीसो सातारा यांच्या आदेशानुसार सातारा जिल्ह्यामध्ये कलम 144 लागू करण्यात आले प्रांताधिकारी श्री शिवाजीराव जगताप यांच्या सूचनेनुसार सर्व पोलीस पाटील यांनी गावांमध्ये स्पीकरवरून याबाबतच्या जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे वाचन केले व सूचनाफलक लिहून जनजागृती केली या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या वर भारतीय दंड विधान 188 नुसार गुन्हा दाखल होऊ शकतो याबाबत गावात स्पीकर वरून माहिती पोलीस पाटलांनी दिली तसेच वेळोवेळी व्हाट्सअप च्या माध्यमातून सर्व सूचना ग्रामस्थांना देत असतानाच शासनाने मागितलेली सर्व माहिती पोलीस पाटील प्रशासनाला वेळोवेळी देत आहेत गावातील सर्व दुकाने बंद करण्यासाठी प्रयत्न करत आहेत अशाप्रकारे कोरोणा विषाणू प्रादुर्भाव रोखण्याच्या युद्धांमध्ये तालुक्यातील पोलीस पाटील सिंहाचा वाटा उचलताना पाहायला मिळत आहे.