फलटण शहरातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने व अन्य उद्योग धंदे पूर्णपणे बंद ठेवून जनता कर्फ्यूला दिला प्रचंड प्रतिसाद

फलटण – फलटण शहरातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने व अन्य उद्योग धंदे पूर्णपणे बंद ठेवून जनता कर्फ्यू चंगला प्रतिसाद मिळाला. आज सकाळपासूनच फलटण शहर परिसरातील गावांमध्ये गावांमध्ये स्वयंस्फूर्तीने नागरिकांनी दुकाने व अन्य उद्योग धंदे पूर्णपणे बंद ठेवले आहेत. मेडिकल व दवाखाना सोडून बाजारपेठांमध्ये पान टपरी, स्टेशनरी दुकाने अन्य सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत.
फलटण शहरातील मुख्य चौका मध्ये व प्रमुख रस्त्यांवर ती आज शुकशुकाट दिसत होता एरवी काही भागामध्ये कधीही बंद पाळला जात नसे परंतु या वेळेला जनता कर्फ्यू हा शंभर टक्के पळाला आहे.
करोना संसर्गजन्य आजारावर मत करण्यासाठी फलटण शहरातील पोलिस प्रशासन, महसूल प्रशासन, आरोग्य प्रशासन व सर्व नगर परिषदेचे कर्मचारी आणि प्रशासकीय अधिकारी कर्मचारी, पत्रकार बंधू तसेच सामाजिक संघटनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या योग्य नियोजनबद्ध पद्धतीने तसेच फलटण शहरातील तालुक्यातील जागरूक नागरिकांच्या मदतीने संपूर्ण शहरात जनता कर्फ्यू आज यशस्वी होताना दिसला आहे.
फलटण शहरातील सुजान नागरीकांना विनती आपण सर्वानी सर्वच यंत्रणेला सहकार्य करा. कोणी रोडवरती विनाकारण फिरू नका. कोणत्याही पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत बसू नका सहकार्य करा. असे जाहिर आवाहन करण्यात आले होते.
आपण शक्य असेल तर आपल्या घरा समोर जर कोणी पोलिस, प्रशासकीय कर्मचारी त्याची ड्यूटी करीत असेल तर त्यांच्यासाठी पाणी, नाश्ता किंवा त्यांना काय हवे आहे याची विचारणा करा. व ते आपल्या सुरक्षेसाठी काम करित आहे याची जाणीव ठेवून वर्तन करावे कारण सर्व बंद असल्याने ड्यूटी वर असणार्‍या कर्मचाऱ्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी. असे प्रतिपादन नगराध्यक्षा सौ. निताताई नेवसे यानी सोशल मिडियाच्या मध्यमातुन केले.
तरी आपण आपली व आपल्या कुटुंबासह इतराची काळजी या कठीण काळात घेवू व आपण घ्यालच अशी अपेक्षा करूयात.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!