आसू/वार्ताहर-राहुल पवार
आसू- फलटण पूर्व भागातील जनतेने कोरोना विषाणूंचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनता कर्फ्यू ला उस्फूर्त प्रतिसाद देऊन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला आसू,पवारवाडी, हनुमंतवाडी,शिंदेनगर,
खटकेवस्ती,गवळीनगर,गोखळी, साठे,राजाळे या सर्व गावाने सहकार्य केले व बंद ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे पाहिला मिळाले.
शुक्रवार (ता.२०) रोजी आसू येथे होणारा जीवनावश्यक आठवडे बाजार बंद ठेवण्यात आला होता. यासाठी भाजीपाला व फळ विक्रेत्यांनी तसेच शेतकऱ्यांनी सहकार्य केले. त्याचबरोबर शनिवार (ता.२१)रोजी पवारवाडी ग्रामस्थांनी बंद ला प्रतिसाद दिला.
तसेच रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेल्या वेळे नुसार सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. या साठी फलटण पूर्व भागाने अतिशय काळजी घेत जनता कर्फ्यू उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कोरोणाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. कोरणा वायरचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वांनी स्वतःची काळजी घेतली पाहिजे तसेच काही नियम व अटी आहेत याचे पालन केले पाहिजे यामुळे कोरोनाचा कोणताही प्रादुर्भाव होणार नाही. या पार्श्वभूमीवर आठवडे बाजार तसेच सर्व दुकाने बंद ठेवून जनता कर्फ्यू ला फलटण पूर्व भागातील जनतेने उस्फूर्त असा प्रतिसाद देत असल्याचे पाहायला मिळते.