बारामती: वार्ताहर कोरोना विषयी उत्कृष्ट जनजागृती करीत स्पर्धा परीक्षा मधील उत्तीर्ण महिलाचा सन्मान करून माता सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ च्या लेकीचा आदर्श जय हो करिअर अकॅडमी ने समाज्यात निर्माण केला आहे. या वेळी
जय हो करिअरअकॅडमी,
बारामती संस्थेचे संस्थापक,संचालक संदिप जाधव ,महेश शिंदे,सौ जाधव आदी मान्यवर उपस्तीत होते. जय हो अकॅडमी चे चौदा विद्यार्थी पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत उत्तीर्ण होऊन पोलीस सेवेत रुजू झाले आहेत. कु.सावित्रा तानाजी कदम(वय २६,कदमवाडी,माळशिरस,सोलापुर) हिने मैदानी चाचणीत १००पैकी १००गुण मिळवुन महिला ओपन वर्गात ११वी रँक मिळवली अत्यंत हालाकिची परिस्थिती असताना तिने केलीली कामगिरी ही आर्थिकदॄष्टया सर्व सामान्य कुटूंबातील मुलींसाठी मार्गदर्शक ठरेल तर सौ. वनिता आनंदा पिसे- वाघमारे यांनी वयाच्या ३४व्या वर्षी मैदानी चाचणीत ९० गुण घेऊन ओबीसी महिला गटात १९वी रँक घेवुन इच्छाशक्तिपुढे वय अडथळा ठरूचं शकत नाही याच जीवंत उदाहरण दिले आहे.
कर्तुत्वान महिलाच सन्मान करून त्यांना प्रोत्साहित करणे म्हनजे खरी समाजसेवा होय असे या संदीप जाधव यांनी सांगितले. या वेळी कोरोना संसर्ग वाढू नये या विषयी घ्यावयाची खबरदारी,दक्षता या विषयी माहिती देण्यात येऊन उपस्तीत पालक,विद्यार्थी यांना मास्क वाटप करण्यात आले.