जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व प्रकारची दुकाने आठवड्यातून फक्त सोमवार आणि गुरुवार या दोनच दिवशी चालू ठेवण्याचे आदेश

सातारा दि. 20 (जिमाका): कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897  दि. 13 मार्च 2020 पासून लागू करुन खंड 2,3 व 4 मधील तरतूदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 25 च्या पोटकलम 2(अ) नुसार अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सातारा जिल्ह्यातील शहरी भागातील म्हणजेच नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्र  व त्यालगतचे 2 किलोमीटर परिसराच्या क्षेत्रातील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने म्हणजेच किराणा, भाजीपाला-फळे, बेकरी, दूध, औषध दुकाने वगळता इतर सर्व प्रकारची दुकाने (कपडे, ज्वेलरी, हार्डवअेर अँड पेंटस्, इलेक्ट्रॉनिक्स, फर्निचर, शू मार्ट, स्टेशनरी, सौंदर्य प्रसाधने, बिल्डींग मटेरियल व इतर सर्व प्रकारची दुकाने) आठवड्यातून फक्त सोमवार आणि गुरुवार या दोनच दिवशी चालू राहतील इतर सर्व दिवशी सदरची दुकाने पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात यावीत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा2005 मधील तरतूदीनुसार पुढील कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
00000
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!