फलटण टुडे : महाराष्ट्र लोकसेवा आयोग च्या वतीने घेण्यात आलेल्या. परीक्षेतून सोमवार पेठ फलटण येथील. सौ. सीमा अक्षय गायकवाड यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली. त्यांनी सोमवार पेठ फलटण येथील पहिल्या महिला पोलीस उपनिरीक्षक होण्याचा मान पटकावला. अत्यंत खडतर परिश्रम करून व तसेच संसाराचा घर -गाडा सांभाळून अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून त्यांनी हे यश संपादन केले आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण फलटण तालुक्यातील फरांदवाडी जिल्हा परिषद शाळेमध्ये झाले तसेच त्यांचे उच्च शिक्षण फलटण एज्युकेशन सोसायटीचे मुधोजी कॉलेज येथे झाले . तसेच त्यांचे डी. एड. हे फलटण येथील जाधववाडीच्या डायटच्या डी. एड. कॉलेज येथे झाले त्यांनी डी.एड. ही चांगल्या गुणांनी पूर्ण केले होते . परंतु शिक्षक भरतीत होत असलेल्या दिरंगाईमुळे त्यांनी आपला मार्ग बदलला व लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षांचा प्रवास त्यांनी सुरू केला. आणि अगदी अत्यल्प कालावधीत त्यांनी पोलीस उपनिरीक्षक पदाची पोस्ट मिळाली.
फलटणच्या सीमा गायकवाड यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत पोलीस उपनिरीक्षक पदी निवड
सौ सीमा गायकवाड यांनी यामध्ये असणारा आत्मविश्वास ध्येयावर ठाम निष्ठा यामुळे त्यांनी असलेल्या महिला व मुलींना आपल्या कर्तुत्वाने प्रेरणास्त्रोत निर्माण करून दिला आहे . मनात आणले तर अडचणींवर व समस्यावर मात करता येऊ शकते व ध्येय निश्चित असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. हे सौ सीमा यांनी दाखवून दिले. त्यांच्या यशात सर्वात मोठा वाटा कोणाचा असेल तर तो त्यांच्या पतीचा व दिरांचा आहे असे त्यांनी सांगितले कोणत्याही स्थितीत न डगमगता त्यांना प्रोत्साहन व मार्गदर्शन करून त्यांना वेळोवेळी मोलाची साथ दिली तसेच त्या आर. पी. आयचे तालुका अध्यक्ष श्री संजय गायकवाड यांच्या भाऊजई आहेत. त्यांच्या पतीने व दिराने त्यांना हे यश संपादन करण्यासाठी पदोपदी मोलाची साथ व पाठबळ दिले . त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे . तसेच विविध ठिकाणी त्यांचे सत्कार व राजकीय ,सामाजिक, शैक्षणिक, क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत.