बारामती:वार्ताहर रुई मधील विविध विकास कामा साठी व श्रायबर डायनॅमिक्स नेहमीच कटिबद्ध राहील अशी ग्वाही कंपनीचे प्रकल्प प्रमुख जितेंद्र जाधव यांनी दिली.रुई मधील ओढा सफाईकरणं कामाचा शुभारंभ प्रसंगी जितेंद्र जाधव बोलत होते बारामती नगरपरिषद बारामती व श्रायबर डायनॅमिक्स डेअरी प्रा ली च्या वतीने ओढा सफाईकरणं कामाचा शुभारंभ करण्यात आला.या वेळी श्रायबर डायनॅमिक्स चे हेमंत चव्हाण,अंकुश दरेकर,हनुमंत जगताप,मानसिंग मांडे,मुकेश चव्हाण व रुई चे माजी सरपंच मच्छिंद्र चौधर, वंजारवाडी चे माजी सरपंच रोहितदास चौधर, राघूशेठ चौधर, सचिन कांबळे आप्पासो चौधर राहुल चौधर, सत्यवान चौधर, अरविंद भोसले ,काशिनाथ चौधर, बाबासाहेब चौधर, गोरख चौधर, विनोद कर्पे, दत्तात्रय चौधर,नवनाथ चौधर.सी एस आर फंडातून विविध समाजउपयोगी कामे कंपनीच्या माध्यमातून केलेली आहेत या पुढील काळातही नागरिकांच्या गरजेनुसार कामे केली जातील असेही जितेंद्र जाधव यांनी सांगितले.कंपनीच्या सहकार्याने अनेक शेतकऱ्यांना शेती साठी पाणी मिळत असल्याने रुई मधील शेतकऱ्यांनी कंपनीस धन्यवाद दिले तर आभार प्रदर्शन विठ्ठल चौधर यांनी मानले.